रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. अपघात असो किंवा इतर शस्त्रक्रिया रक्ताची गरज ही भासतेच. काही जण आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान राखत रक्तदान करतात. मात्र सध्या रक्तदान शिबिर होत नसल्याकारणाने मुंबई शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहतंय.मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे दरवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतं. या वेळी देखील रक्तदान शिबिरातील रक्त हे राज्य आणि परराज्यात संकलन करण्यात आलं. मात्र आता शहरातील रक्तपेढ्य़ांमधील रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसतोय.
आरोग्य यंत्रणेसमोर आता हे नवं आव्हान उभं राहिलं आहे. खरंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याचं कारण म्हणजे रक्तदान शिबिराच्या आयोजनात होणारी घट. गणपतीनंतर शहरात म्हणावं तसं रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं नाही. दसरा दिवाळीच्या अनेक गावी सणवार साजरे करता. त्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन कमी होत गेलं. याचाच परिणाम म्हणजे, रक्तपेढ्यातील रक्ताच्या बॅग कमी होत चालल्या आहेत. रक्ताची जेवढी मागणी होतेय त्या तुलनेत पुरवठा होण्यास अडथळा होतोय त्यामुळे जर असंच सुरु राहिलं तर भविष्यात ही समस्या मोठी होऊ शकते. असा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर, राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन व्हावं यासाठी जनजागृती तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
करोडोंच्या संख्येने राहणाऱ्य़ा मुंबई शहरात सध्या, 1101 इतके रक्ताचे युनिट राहिल्याने आरोग्य यंत्रणा रक्तदान शिबिराने आयोजन करण्याचे आवाहन करत आहे. त्यातल्या त्यात भरीला भर म्हणजे बी निगेटिव्ह. एबी निगेटिव्ह या रक्तगटाचे युनिट संपल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. हे कमी की काय म्हणून रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची शस्रक्रिया देखील पुढे ढकलावी लागली असल्याचं काही रुग्णालयांनी सांगितलं आहे.फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर नवी मुंबई महानगर पालिकेतही रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येतंय.

याच समस्येवर मुंबई आणि उपनगरात मोठ्य़ा प्रमाणात रक्तदान शिबिर होण्यासाठी सामाजिक संघटना देखील आता पुढे सरसावल्य़ा आहेत. यातील एक सामाजिक संस्था ‘लढा रक्तदानाचा’ यांच्य़ा वतीने सायन रुग्णालयात रक्तदान करण्याचं आवाहन करत आहे.शस्रक्रिया आणि अपघात या व्यतिरिक्त देखील रक्ताची गरज असते ते थॅलेसेमियाच्या रुग्णांना. या रुग्णांना तब्बल 15 ते 20 दिवसांनी रक्ताची सतत गरज असते. अन्यथा यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याचमुळे ‘लढा रक्तदानाचा’ या संस्थेने थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या मुलांच्या भविष्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावं. तसंच सोसायटी आणि कामाच्या ठिकाणी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी काही मदत हवी असल्याचं संपर्क करु शकता असं देखील सांगितलं आहे.
लढा रक्तदानाचा ही संस्था कोविड काळापासून रक्तसेवेत कार्यरत आहे. ही संस्था विविध रुग्णालयातील गरजूंपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करते. जर तुम्हाला तुमच्या सोसायटीत किंवा कामाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची इच्छा असल्यास ‘लढा रक्तदानाचा’ या संस्थेचे किशोर सातपुते यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क +91 99300 46079 करु शकता.
Ans: दसरा दिवाळीच्या अनेक गावी सणवार साजरे करता. त्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन कमी होत गेलं. याचाच परिणाम म्हणजे, रक्तपेढ्यातील रक्ताच्या बॅग कमी होत चालल्या आहेत. रक्ताची जेवढी मागणी होतेय त्या तुलनेत पुरवठा होण्यास अडथळा होत आहे.
Ans: शस्रक्रिया आणि अपघात या व्यतिरिक्त देखील रक्ताची गरज असते ते थॅलेसेमियाच्या रुग्णांना. या रुग्णांना तब्बल 15 ते 20 दिवसांनी रक्ताची सतत गरज असते. अन्यथा यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.






