फोटो सौजन्य - Social Media
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत प्रगत आणि टर्मिनल अवस्थेतील प्रोस्टेट कर्करोग रुग्णावर यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळवले आहे. ६६ वर्षीय विनय वैद्य यांच्यावर अनेक थेरपी आणि केमोथेरपी अपयशी ठरल्यानंतर, डॉक्टरांनी ल्युटेशियम थेरपीचा प्रयोग करत जीवदान दिले. रुग्णाची प्लेटलेट संख्या अवघी ७,००० इतकी कमी होती, जी सामान्यतः अशा थेरपीसाठी योग्य मानली जात नाही. तरीही डॉ. जेहान धाभार (कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. विक्रम लेले (न्यूक्लिअर मेडिसीन डिपार्टमेंटचे संचालक) यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने काळजीपूर्वक नियोजन करत उपचार सुरू केले.
“५०,००० पेक्षा कमी प्लेटलेट संख्या असलेल्या रुग्णांवर सहसा ल्युटेशियम थेरपी केली जात नाही,” असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी डॉ. जेहान धाभार म्हणाले. “इतक्या कमी प्लेटलेट संख्या असलेल्या रुग्णावर उपचार करणे अभूतपूर्व होते आणि त्यात काळजीपूर्वक जोखीम मूल्यांकन व नियोजन करणे आवश्यक होते. आम्ही रुग्णाला स्पष्टपणे सांगितले की हा एक नवीन दृष्टिकोन आहे, तरीही उपचार यशस्वी होण्याची शक्यता आहे.”
“या केसमधून वैयक्तिक काळजी आणि नाविन्यतेची ताकद दिसून येते,” असे ज सलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या न्यूक्लिअर मेडिसीन डिपार्टमेंटचे संचालक डॉ. विक्रम लेले म्हणाले. “समकालीन उपचार प्रोटोकॉल्सच्या मर्यादांना दूर करत आणि रूग्णाच्या अद्वितीय स्थितीनुसार थेरपी तयार करत आम्ही पूर्वी उपचार न होऊ शकलेल्या रूग्णांसाठी नवीन मार्ग खुले केले आहेत. या केसमधून आधुनिक ऑन्कोलॉजीमध्ये बहुआयामी सहयोग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान साध्य करू शकणारे यश दिसून येते.”
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खडके म्हणाले, “हे फक्त वैद्यकीय आव्हान नव्हते तर विश्वास, अभिनवता आणि दृढनिश्चयाची परीक्षा होती. इतर सर्व पर्याय संपले असताना आणि प्रगत उपचारांसाठी त्याची प्रकृती खूपच गंभीर मानली जात असताना रुग्ण आमच्याकडे आला. जोखीम असूनही आमच्या टीमने त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा आणि शक्य तितकी सर्वोत्तम काळजी देण्याचा निर्णय घेतला. यासारख्या केसमधून जसलोकमधील आमची क्षमता दिसून येते, जेथे आशेचा किरण जागृत करण्यासह उत्तम कौशल्यापूर्ण उपचार केले जातात, तसेच बरे होण्याची थोडीशीही आशा असल्यास रूग्णावर सर्वोत्तम उपचार केले जातात.”
विनय वैद्य यांनी उपचारांनंतर पूर्णतः नवजीवन अनुभवले असून त्यांच्या रक्तातील पीएसए लेव्हल १ पेक्षा कमी झाली आहे. त्यांना आता प्लेटलेट ट्रान्सफ्युजनची गरज नाही आणि ते पुन्हा दैनंदिन कामकाज करत आहेत. कृतज्ञतापूर्वक वैद्य म्हणाले, “माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा फरक जसलोक हॉस्पिटलने घडवून आणला. आज मी पुन्हा आशेने जगत आहे.”