Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ट्रेकिंग, पोहणे, जड बॅगा ठरू शकतात धोकादायक; चुकीच्या सवयींमुळे वाढू शकतो फ्रोजन शोल्डरचा त्रास , काय आहे तज्ज्ञांचा इशारा?

सुट्टीदरम्यान प्रवास, ट्रेकिंग, पोहणे किंवा साहसी खेळांमुळे खांद्यावर अतिरिक्त ताण येऊन दुखापतीचा धोका वाढू शकतो. चुकीच्या पद्धतीने जड वस्तू उचलणे, वॉर्मअप न करणे आणि दीर्घकाळ बॅग वाहून नेणे यामुळे खांदेदुखी, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर किंवा खांदा निखळण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 03:40 PM
ट्रेकिंग, पोहणे, जड बॅगा ठरू शकतात शरीरासाठी धोकादायक; चुकीच्या सवयींमुळे वाढू शकतो फ्रोजन शोल्डरचा त्रास , काय आहे तज्ज्ञांचा इशारा? (फोटो सौजन्य-ChatGPT)

ट्रेकिंग, पोहणे, जड बॅगा ठरू शकतात शरीरासाठी धोकादायक; चुकीच्या सवयींमुळे वाढू शकतो फ्रोजन शोल्डरचा त्रास , काय आहे तज्ज्ञांचा इशारा? (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • सुट्टीच्या आनंदात खांदेदुखीचा अडथळा!
  • प्रवास आणि साहसी खेळांदरम्यान घ्या ही काळजी
  • चुकीच्या सवयींमुळे वाढू शकतो फ्रोजन शोल्डरचा धोका
 

Health Tips Marathi : सुट्टी म्हणजे आराम, प्रवास आणि साहसी अनुभवांचा आनंद. मात्र या काळात शरीरावर, विशेषतः खांद्यांवर येणाऱ्या ताणाकडे दुर्लक्ष केल्यास आनंदावर पाणी फिरू शकते. डॉक्टरांच्या मते, सुट्टीदरम्यान चुकीच्या पद्धतीने जड बॅगा उचलणे, लांब प्रवास, ट्रेकिंग, पोहणे किंवा साहसी खेळ यामुळे खांद्याच्या दुखापतींचे प्रमाण वाढते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी वेदना दुर्लक्षित केल्यास पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, लांब पल्ल्याचा प्रवास, साहसी खेळ किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे-झोपणे यामुळे अनेकांना खांदेदुखीचा त्रास जाणवतो. अचानक आलेला ताण, चुकीची शरीरस्थिती आणि खांद्याचा अतिवापर यामुळे स्नायूंवर ताण येतो, लिगामेंट दुखापत, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर किंवा खांदा निखळण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

प्रवासादरम्यान विमानातील वरच्या कप्प्यात आपली बॅग ठेवणे, दीर्घकाळ पाठीवर बॅग उचलून धरणे, सतत पोहणे किंवा ट्रेकिंग करणे यामुळे खांद्यावर ताण येतो. तसेच रिव्हर राफ्टिंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, कायाकिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, रॉक क्लाइंबिंग, सर्फिंग आणि झिपलाइनिंगसारखे साहसी खेळ काहीवेळा दुखापतीस कारणीभूत ठरू शकतात. अनेकजण कोणतीही शारीरिक हालचाल किंवा खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करत नाहीत, त्यामुळे खांद्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण पडतो.

कारने लाबंचा प्रवास किंवा विमान प्रवासादरम्यान चुकीच्या शारीरीक स्थितीत बसल्यानेही खांद्यातील स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना निर्माण होतात. अनेक लोक सुरुवातीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतात. मात्र वेळीच उपचार न घेतल्यास समस्या गंभीर रुप धारण करतात आणि दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रवासादरम्यान नियमित स्ट्रेचिंग करणे, सामानाचे वजन योग्य पद्धतीने वाटून घेणे, योग्य शारीरीक स्थिती ठेवणे, अधुनमधुन विश्रांती घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि कोणतीही व्यायाम करण्यापूर्वी वॅार्म अप करणे आवश्यक आहे.

यासाठी वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक्स, शोल्डर सर्जरी, आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन, डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई डॉ. आदित्य साई यांनी सांगितले की, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतींवर पुरेशी विश्रांती घेणे, बर्फाने शेकवणे, वेदनाशामक औषधं आणि फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. मात्र सतत वेदना, सूज, कमजोरी किंवा हालचालींमध्ये अडथळा निर्माण होत असल्यास इंजेक्शन किंवा शस्त्रक्रियेची गरज भासते. आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर, लिगामेंट्सची पुनर्बांधणी, टेंडन रिपेअर किंवा शोल्डर स्टॅबिलायझेशन शस्त्रक्रिया अशा उपचारांचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जाऊ शकतो. उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन काळात योग्य काळजी घेतल्यास प्रवासाच्या आनंदावर दुखापतींचे सावट येणार नाही.

हाय ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रोलपर्यंत सर्व आजार होतील गायब, फक्त आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक ड्रिंकचा समावेश; हार्टला ठेवतो हेल्दी

Web Title: Shoulder pain during travel adventure sports health tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Fitness
  • Health Tips
  • Symptoms

संबंधित बातम्या

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
1

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?
2

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
3

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.