Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाल्यावस्थेतील कर्करोगग्रस्त मुलांसाठी ‘सुनेहरे स्वर बन जायेंगे गोल्ड’ संगीत मैफिल

बालकर्करोग रुग्णांसाठी आशा आणि प्रेरणेचा संदेश देणारी ‘सुनेहरे स्वर- बन जायेंगे गोल्ड’ ही संगीत मैफिल यशस्वी ठरली. या उपक्रमातून 3.5 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 04:20 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘सुनेहरे स्वर- बन जायेंगे गोल्ड’ ही धर्मादाय संगीत मैफिल सादर
  • उद्देश ‘केअर फॉर किड्स विथ कॅन्सर’साठी निधी उभारणे
  • 3.5 कोटींचा निधी उभारण्याचे ध्येय
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या मदतीसाठी कॅनकिड्स किड्सकॅन या स्वयंसेवी संस्थेने आणि बांसुरी म्युझिक ग्रुपने संयुक्तपणे ‘सुनेहरे स्वर- बन जायेंगे गोल्ड’ ही धर्मादाय संगीत मैफिल सादर केली. 9 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश ‘केअर फॉर किड्स विथ कॅन्सर’साठी निधी उभारणे हा होता. बाल्यावस्थेतील कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि उपचारांसाठी मदत पुरवणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, किडनी खराब होऊन कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत देओल, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. श्रीपाद बाणावली, तसेच डॉ. पूर्णा कुरकुरे उपस्थित होते. डॉ. राहुल जोशी, राजेश अय्यर आणि संगीता मळेकर यांनी लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांच्या अमर गीतांवर आधारित सादरीकरण करून वातावरण भारून टाकले.

कॅनकिड्स संस्थापिका पूनम बागई म्हणाल्या, “संगीत जेव्हा ध्येय साध्य करतं, तेव्हा ते आशेला नवी उभारी देतं. आम्ही महाराष्ट्रातील बालकर्करोग रुग्णांसाठी सुमारे 3.5 कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.5 कोटी रुपये टीएमएच मुंबईतील 1,000 मुलांच्या आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आणि 2 कोटी रुपये नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापूरसह प्रादेशिक केंद्रांसाठी वापरण्यात येतील.”

डॉ. बाणावली यांनी सांगितले की, “बाल्यावस्थेतील कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र वैद्यकीय उपचारांसोबत शिक्षण, समुपदेशन आणि पोषण यासाठी मदत आवश्यक आहे.” रणजीत देओल यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शासकीय सहकार्याचे आश्वासन दिले.

रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पदार्थ! थंडगार वातावरणात झटपट बनवा आंबटगोड चिंचेचा भात, नोट करून घ्या रेसिपी

प्रेक्षकांनी मुलांसोबत गाणं-नाच करत भावनिक वातावरणात या मैफिलीचा आनंद घेतला. “कॅन्सर को ढिशूम ढिशूम! बन जायेंगे गोल्ड” या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली. ही मैफिल केवळ संगीत नव्हे, तर आशा, प्रेरणा आणि मानवतेचा संदेश घेऊन संपन्न झाली.

Web Title: Sunehare swar ban jayenge gold music concert for children with childhood cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:20 AM

Topics:  

  • cancer

संबंधित बातम्या

कर्करोग उपचारांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर दिला जाणार भर! एनसीजी-इंडिया एआय ‘कॅच’ अनुदान, एआयची अमलबजावणी गरजेची
1

कर्करोग उपचारांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर दिला जाणार भर! एनसीजी-इंडिया एआय ‘कॅच’ अनुदान, एआयची अमलबजावणी गरजेची

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील Cranberry! जाणून घ्या शरीराला होणारे जादुई फायदे
2

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील Cranberry! जाणून घ्या शरीराला होणारे जादुई फायदे

Liver Cancer : क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन; समजून घ्या लिव्हर कॅन्सरचा धोका आणि त्याचे टप्पे…
3

Liver Cancer : क्रिकेटर रिंकू सिंहच्या वडिलांचे स्टेज-४ कॅन्सरने निधन; समजून घ्या लिव्हर कॅन्सरचा धोका आणि त्याचे टप्पे…

कर्करोगाविरुद्ध तीन स्तरांवरील प्रभावी उपचार पद्धती; शस्त्रक्रिया, केमोथेरपीद्वारे रुग्णांना नवजीवन देणारी आधुनिक वैद्यकीय क्रांती
4

कर्करोगाविरुद्ध तीन स्तरांवरील प्रभावी उपचार पद्धती; शस्त्रक्रिया, केमोथेरपीद्वारे रुग्णांना नवजीवन देणारी आधुनिक वैद्यकीय क्रांती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.