सकाळी उठल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला कायमच थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. किडनीमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते आणि थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर प्रामुख्याने सकाळच्या वेळी शरीरात थकवा जाणवतो.
किडनी खराब झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे लघवीत फेस येणे. लघवीमध्ये वाढलेल्या वेदना, लघवीमध्ये सतत होणारी जळजळ, फेस इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. किडनी खराब झाल्यानंतर लघवीचा रंग खूप जास्त गडद होऊन जातो. याशिवाय काहीवेळा लघवी करताना खूप जास्त वेदना होतात.
वारंवार लघवीला होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे खूप जास्त तहान लागते. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्यानंतर वारंवार लघवीला होणे, वारंवार तहान लागणेइत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. तसेच सकाळी झोपेतून उठल्यानंतर पोटात सूज किंवा मुरडा येऊन पोटात वेदना वाढू लागतात. किडनी खराब झाल्यानंतर डोळ्याखाली सूज, चेहरा फुललेला किंवा पायांमध्ये सूज येऊन शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.
शरीरातील विषारी घटक किडनीमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे, रॅश येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. शरीरात जमा झालेल्या विषारी घटकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर दिसू लागतो. त्वचेमध्ये वाढलेल्या खाजेमुळे काहीवेळा जखमा होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर प्रामुख्याने चेहऱ्यावर खाज येते.






