मुलांच्या 'या' सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, बालपणीच सुधारल्या तर आयुष्यभर रहाल निरोगी
आजच्या काळात मधुमेह ही एक गंभीर समस्या बनली आहे. हा एक आजार आहे जो सध्याच्या जगात झपाट्याने वाढत चालला आहे. याचा परिणाम केवळ प्रौढांवरच होत नाही तर मुलांमध्येही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत – टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 मधुमेह सहसा अनुवांशिक कारणांमुळे होतो, परंतु जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.
मधुमेहाचा धोका वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र आज आपण या लेखात अशा काही कारणांविषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे सहसा लहान मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढण्याची जास्त शक्यता असते. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
घनदाट-लांबलचक केसांसाठी 5 रुपयांचा ‘हा’ पदार्थ ठरेल रामबाण, फक्त अशाप्रकारे करा वापर
चुकीचा आहार
चुकीचा आहार हे लहान मुलांमध्ये मधुमेहाचे एक महत्त्वाचे कारण आहे. आजकाल मुलं जंक फूड, फास्ट फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स आणि गोड स्नॅक्स जास्त खातात. या पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि यामुळे मधुमेह होण्याच्या शक्यतेत वाढ होते.
शारीरिक हालचालीत कमतरता
आधुनिक जीवनशैलीत मुले टीव्ही, मोबाइल आणि व्हिडिओ गेम्समध्ये जास्त वेळ घालवतात. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढतो, जो टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
लठ्ठपणा
लठ्ठपणा हे लहान मुलांमध्ये मधुमेहाचे महत्त्वाचे कारण आहे. हाय कॅलरीज डाएट आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीजच्या अभावामुळे मुलांचे वजन वाढते. लठ्ठपणामुळे शरीरातील इन्सुलिन रेजिस्टेंस क्षमता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.
जास्त गोड खाणे
मुलांना गोड पदार्थ खायला फार आवडतात, पण चॉकलेट, कँडी, मिठाई आणि साखरेने भरलेले पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने त्यांच्या शरीरातील साखरेची झपाट्याने पातळी वाढू शकते. या सवयीमुळे मुलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
झोपेची कमतरता
झोपेच्या कमतरतेमुळेही मुलांमध्ये मधुमेह होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरातील मेटाबॉलिजमवर परिणाम होतो आणि इन्सुलिनची सेंसिटिविटी कमी होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
स्ट्रेस
आजकाल मुलांनाही अभ्यास, परीक्षा आणि सोशल दबाव यांमुळे तणावाचा सामना करावा लागतो. तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे; शरीराच्या ‘या’ लक्षणांवरून वेळीच सावध व्हा, नाहीतर मृत्यूला बळी पडाल
अनुवांशिक आजार
जर कुटुंबातील एखाद्याला मधुमेह असेल तर मुलांमध्ये त्याचा धोका जास्त असतो. हे जेनेटिक फॅक्टर असले तरी, वाईट सवयी आणि अनहेल्दी लाइफस्टाइल हा धोका आणखीन वाढवू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.