अमृतापेक्षा कमी नाही स्वयंपाकघरातील 'हा' मसाला, दुधात मिसळून प्या; मुळापासून दूर होईल सांधेदुखीचा त्रास
आपले आरोग्य हे आपल्या हातात असते. आपण जे काही खातो अथवा पितो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशात आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे फार गरजेचे असते. अनेकदा आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधी गोळ्यांचा आधार घेतो. याने तेवढ्यापुरती आराम तर मिळतो मात्र काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरु होतो. वयोमानानुसार, आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर अनेक बदल घडून येतात. जसजसे वय वाढते तसतशा आरोग्याच्या समस्याही वाढू लागतात मात्र तुम्हाला माहिती आहे का? या समस्यांवरचा उपाय आपल्या घरातच उपलब्ध आहे.
हळद ही एक अशी गोष्ट आहे जी स्वयंपाकघरात दररोज वापरली जाते. हळदीचा वापर फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही केला जात तर आरोग्यासाठीही याचे सेवन फायदेशीर आहे. तुम्ही रात्री झोपण्याआधी दुधात हळदी पावडर आणि मध मिसळून याचे सेवन करू शकता. तुमच्या आरोग्यासाठी हा एक सोपा आणि रामबाण उपाय आहे. आयुर्वेदामध्ये कच्च्या हळदीचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. रात्री दुधात कच्ची हळद उकळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
सांधेदुखीच्या त्रासापासून मिळेल आराम
कच्च्या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात जे सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. जर तुम्हाला सांधेदुखीने त्रास होत असेल आणि अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही आराम मिळत नसेल तर तुम्ही कच्च्या हळदीचे सेवन सुरू करावे. कच्च्या हळदीमुळे सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद मिसळून त्याचे सेवन करा. हळदीच्या दुधाने रात्री शांत झोप लागण्यासही मदत मिळते.
पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत करते
तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असल्यास हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कच्च्या हळदीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. जर तुम्ही नियमितपणे कच्च्या हळदीचे सेवन केले तर ते तुमची पचनसंस्था मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे कच्च्या हळदीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.
त्वचेसाठीही ठरेल फायदेशीर
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल मात्र अनेक त्वचेच्या समस्याही हळदीने दूर करता येतात. कच्च्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. दुधाव्यतिरिक्त तुम्ही कच्ची हळद पाण्यातही उकळू शकता. नंतर हे पाणी गरम पाण्याच्या बाटलीत मिसळा. आता हे पाणी दिवसभर पीत राहा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
कर्करोगाचा धोका कमी करते
यासोबतच कच्च्या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. कच्ची हळद वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल किंवा कोणत्याही आरोग्य समस्यांनी ग्रस्त असाल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.