(फोटो सौजन्य: istock)
आपल्या आरोग्याला सदृढ आणि निरोगी ठेण्यासाठी आपल्या आहारात काही घटकांचा समावेश करणे महत्त्वाचे ठरते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अशात काही हेल्दी पदार्थांच्या सेवनाने तुम्ही तुमचे आरोग्य दीर्घकाळ अनुकूल ठेवू शकता. बदलत्या वातावरणांनुसार, आजारांचे प्रमाणही वाढले आहेत. आजकाल प्रत्येकाला एकतरी आजार जडलेला असतोच. अशात आज आम्ही तुम्हाला अशा एका पदार्थविषयी सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्यांना क्षणार्धात छूमंतर करू शकता.
कोरफड हे आयुर्वेदात चमत्कारिक औषध मानले जाते. बऱ्याच वर्षांपासून ते आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरले जात आहे. कोरफडीचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कोरफडमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, एन्झाइम्स आणि अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम सारखी खनिजे आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत.
पचनसंस्थेला मजबूत करते
कोरफडीचा रस सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी यांसारख्या गॅस्ट्रिक समस्या दूर होतात. यामध्ये अनेक एन्झाईम्स असतात, जे पचनास मदत करतात. हे आपली आतडे चांगल्या प्रकारे स्वच्छ करते. कोरफडीचा रस चयापचय गतिमान करतो, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होते. डिटॉक्सिफिकेशन सोबतच, हे आपले वजन कमी करण्यास देखील मदत करते.
इम्यूनिटी वाढेल
कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, ते शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे आपल्याला अनेक संक्रमणांपासून संरक्षण मिळते. हे शरीरातील अनेक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि किडनी देखील स्वच्छ करते, ज्यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील दूर होतात.
त्वचेसाठी फायदेशीर
NIH (National Institutes of Health) च्या मते, कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने त्वचेला आतून पोषण मिळते, यामुळे त्वचा मुलायम होते आणि त्वचेवर नवीन तेज येऊ लागते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि सनबर्न यासारख्या समस्या दूर करण्यासाठीही कोरफडीचे रस फायदेशीर ठरते . हे आपल्या शरीराला हायड्रेट करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पेशी योग्यरित्या कार्य करतात.
आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांनी सावधान! Survey मध्ये समोर आले भयान
मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
कोरफडीचा रस शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोरफडीचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरते.
हाडांना आणि सांध्यांना मजबूत बनवते
सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने आपली हाडेदेखील मजबूत होऊ लागतात. यामध्ये कॅल्शियम आणि अनेक खनिज घटक असतात, जे हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. कोरफडीचा रस प्यायल्याने सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
कोरफडीचा ज्यूस घरी कसा तयार करावा?
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा