5 रुपयांचा हा पदार्थ पोटातील घाण कोलेस्ट्रॉल करतो साफ, आजच आहारात करा समावेश
जगभरात झपाट्याने वाढत असलेली समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल. ही समस्या दिवसेंदिवस आणखीनच गंभीर बनत असून आजकाल अनेकांना ही समस्या भेडसावत आहे. चुकीचा आहार, तणावपूर्ण जीवनशैली आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तुम्हालाही जर कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही ही समस्या सहज आणि सोप्या रीतीने दूर करू शकता.
तुम्हाला माहिती आहे का? आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा हा एक पदार्थ तुमची कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास तुमची मदत करू शकतो. या पदार्थाचे नाव आहे पांढरे तीळ. घराघरात हा पदार्थ उपलब्ध असतोतिळामध्ये पोषणतत्त्वे आणि औषधी गुणधर्म आहेत, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. आज आपण या लेखात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तिळाचा आपल्या आहारात कसा समावेश करावा आणि याचे फायदे जाणून घेणार आहोत.
शरीरात दुसऱ्या Blood Group चे रक्त चढवले तर काय होईल? जाणून घ्या
तिळामध्ये उपलब्ध आहेत अनेक पोषकतत्वे
तिळामध्ये अनेक पोषक घटक आढळले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील घाण आणि हानिकारक कोलेस्ट्रॉल दूर करण्यास मदत करतात. तिळाच्या नियमित सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करते मदत
तिळामध्ये असलेल्या सिसामोलिन (Sisamoline) आणि सिसामिन (Sesamin) या घटकांमुळे शरीरातील एलडीएल (LDL) म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि एचडीएल (HDL) म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते. दररोज तिळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या फॅटची पातळीही नियंत्रणात राहते.
जीवनात यशाची शिडी चढायची असेल तर जरूर शिकून घ्या ‘हे’ 5 Social Skills
असा करा आहारात समावेश
आहारात तिळाचा समावेश वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. तुम्ही यापासून तिळाचे लाडू, चटणी तसेच चपाती, भाकरी किंवा थालीपीठमध्ये याचा वापर करू शकता. याचबरोबर, सकाळी उठल्यावर उपाशी पोटी तुम्ही भाजलेल्या तिळाचे सेवन करू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदयविकाराचा धोका टळतो.