Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026 Live: पर्यटन क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! देशात १० हजार नवीन Tourist guide करणार तयार

Budget 2026 tourism sector : अर्थसंकल्प 2026 मध्ये पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवे पर्यटन सांस्कृतिक केंद्राची उभारणी आणि टुरिस्ट गाईड तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 01, 2026 | 12:31 PM
10 thousand tourist guides ready tourism sector announcement by Nirmala Sitharaman in Union Budget 2026

10 thousand tourist guides ready tourism sector announcement by Nirmala Sitharaman in Union Budget 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा अर्थसंकल्प 2026 सादर
  • पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये खास तरतूद
  • र्यटन क्षेत्रावर १० हजार गाईड्सचे निर्मिती
Budget 2026 Tourism Sector : नवी दिल्ली : भारताचा 2026-27 वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2026) सादर केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या लोकसभेमध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांचा हा सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत असून संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सामान्य लोकांना काय मिळणार आणि त्यांच्या खर्चामध्ये कपात होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये खास तरतूद करण्यात आली आहे.

भारतामध्ये वैविध्यपूर्ण पर्यटन क्षेत्र आहे. निसर्ग, संस्कृती आणि परंपरा याचा अनोखा संगम असलेले पर्यटन भारताला लाभले आहे. यामध्ये पर्वतरांगा, हिमालयीन प्रदेश, तिन्ही बाजूंनी समुद्र किनारा आणि जाज्वंल इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा कल वाढवण्यासाठी आणि त्यामधून रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूदी केल्या आहेत. याबाबत निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये भाषणामध्ये घोषणा केली आहे.

हे देखील वाचा : विरोधकांना अर्थसंकल्पातून नाही कोणती अपेक्षा; प्रियांका गांधींचा नाराजीचा सूर

काय आहे पर्यटन क्षेत्रासाठी तरतूद?
अर्थसंकल्प 2026 मध्ये पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. देशातील २० महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रावर १० हजार गाईड्सचे निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे परदेशातून भारताच्या पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना परिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली जाईल. तसेच यामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या घोषणेमुळे स्थानिक लोकांना टुरिस्ट गाईड म्हणून पर्यटकांना माहिती देण्याची संधी मिळेल. तसेच यानिमित्ताने मूळ गावीच रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्राबाबत एक मोठी घोषणा केली. येत्या काळात देशातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. त्याचबरोबर देशामध्ये नवी सांस्कृतिक केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा हातभार लागणार असून अर्थिक स्थिती देखील सुधारली जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पर्वतीय मार्ग बांधले जातील अशी महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

त्याचबरोबर पाच ईशान्येकडील राज्यांमध्ये पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल. राष्ट्रीय आतिथ्य संस्था स्थापन केली जाईल आणि १५ पुरातत्वीय स्थळे जीवंत स्थळे म्हणून विकसित करण्याचे ध्येय असल्याचे देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. डिजिटल नॉलेज ग्रिडवरील पर्यटन स्थळांची माहिती दिली जाणार असून  ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी योजना आखण्यात येणार आहे. तसेच टीसीएस परदेशी टूर पॅकेजेसमध्ये २ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: 10 thousand tourist guides ready tourism sector announcement by nirmala sitharaman in union budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitharaman
  • union budget
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

Budget 2026 Live: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून नवा Income Tax Law लागू; अपघात विमाही करमुक्त
2

Budget 2026 Live: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून नवा Income Tax Law लागू; अपघात विमाही करमुक्त

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
3

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Education Union Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी! रोजगार वाढीला दिली चालना
4

Education Union Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी! रोजगार वाढीला दिली चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.