नवी दिल्ली : केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींना गेल्या वर्षी सोन्यानं मढवण्यात आलंय. मंदिराला येणाऱ्या देणग्यांच्या पैशांतून हे काम करण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांनी या प्रकरणात मोठा आरोप केला आहे. मंदिरात लावण्यात आलेलं सोनं हे आता पितळ झालेलं आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनीा केलाय. भिंतींना सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली 125 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
मंदिर समितीच्या वतीनं आरोपांना काय प्रत्युत्तर
या आरोपांवर बद्री केदार मंदिर समितीच्या वतीनं स्परष्टीकरण देण्यात आलंय. हे सर्व आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण समितीच्या वतीनं देण्यात आलंय. एका देणगीदाराची मंदिरातील गाभाऱ्याला सोन्यानं सजवण्याची इच्छा होती, असंही मंदिर समितीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. या देणगीदाराच्या इच्छेचा सन्मान करत, याबाबतचा निर्णय बोर्डाच्या मिटिंगमध्ये घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. पुरातत्व विभागाच्या देखरेखीत मंदिरातील गाभाऱ्याच्या भिंतीवंर सोनं चढवण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
कसा प्रकारे करण्यात आलं गोल्ड प्लेटिंग
या देणगीदारानं त्याच्या सोनाराच्या मार्फत मंदिरात गोल्ड प्लेटिंगचं काम केलंय, असंही समितीनं स्पष्ट केलंय. या गोल्ड प्लेटिंगवरुन वाद निर्माण झाल्यानं समितीाच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलंय. गेल्या वर्षी जेव्हा या गोल्ड प्लेटिंगला मंजुरी देण्यात आली होती त्यावेळी काही पुजाऱ्यांनी याला विरोध केला होता. सोनं हे धनाचं प्रतिक आहे, केदारनाथच्या श्रद्धा आणि अस्थेच्या विरोधात हे गोल्ड प्लेटिंग असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.
सोनं नव्हे पितळ, पुजाऱ्याचा दावा
या वादात आत्तापर्यंत 125 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांनी केलाय. सोन्याऐवजी पितळं वापरण्यात आल्याचं त्यांचं म्हणणंय. आता मंदिर समितीच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आलीय., या सोन्याची योग्य तपासणी करण्यात आली नसल्याचा दावाही करण्यात आलाय. आता या प्रकरणावरुन राजकारणही रंगताना दिसतंय.
हे संवेदनशील प्रकरण- अखिलेश यादव
हे संवेदनशील प्रकरण आहे, गुन्हेगारी स्वरुपाचं दिसतं आहे. तसंच हे सामान्य भाविकांच्या विश्वासाशी संबंधित असल्याचं सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलंय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. मात्र मंदिर समितीनं मात्र हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. गेल्या काही वर्षआंत केदारनाथमध्ये येणाऱ्य़ा भाविकांची संख्या दुप्पट झाल्याचं काही राजकीय पक्षांना पसंत पडलेलं नाही, असं त्यांचं म्हणणंय