रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला भरधाव ट्रकची धडक; ६ जणांचा मृत्यू, 27 जखमी

एका भरधाव ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या बसला धडक दिली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून तर 27 हून अधिक जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    गोरखपूर : देशभरात दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्यात येत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अशातच उत्तरप्रदेशध्ये मात्र, काही जणांच्या घरातील उत्साहाचं वातावरण शोकाकुल वातावरणात बदललं आहे. गोरखपूरमध्ये एका बसचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघाता 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जवळपास 27 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    नेमकं काय घडलं

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमधील गोरखपूर कुशीनगर महामार्गावर हा अपघात झाला. गोरखपूरहून उत्तर प्रदेशातील पड्रोनाला जाणारी बस गुरुवारी रात्री प्रवाशांना घेऊन जात होती. त्यानंतर मल्लापूर गावाजवळ बसचा टायर पंक्चर झाला. रात्रीच्या वेळी प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी दुसरी बस मागवण्यात आली. दुसरी बस आल्यानंतर पंक्चर झालेल्या बसमधील प्रवासी बसमध्ये चढत होते. या दरम्यान रात्री अकराच्या सुमारास एका भरधाव ट्रकने येऊन बसला जोरदार धडक दिली. या अपघाता 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर बसमध्ये बसलेले 27 हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी मृतदेहांचे ढीग साचला होता. जखमींना रुग्णालयात पाठवले असता, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी ३ जणांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवले, तेथे जखमींवर उपचार सुरू आहेत.

    धनत्रयोदशीला घरात शोककळा

    धनत्रयोदशीच्या आदल्या रात्री झालेल्या या अपघातात ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. सणाच्या दिवशी त्यांच्या घरी शोककळा पसरलेली आहे. मृतांमध्ये नितीश सिंह, सुरेश चौहान, हिमांशू यादव आणि शैलेश पटेल यांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवून मृतांच्या कुटुंबीयांना कळवण्यात येईल आणि मृतदेह शवविच्छेदन करून त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.