Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himachal Pradesh Disaster : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं थैमान! ६९ जणांचा मृत्यू, ३७ जण बेपत्ता, संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात यावर्षी पावसाळ्याने भीषण रौद्ररूप धारण केलं असून राज्यभरात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आहे. २० जूनपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत ६९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 04, 2025 | 12:31 AM
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं थैमान! ६९ जणांचा मृत्यू, ३७ जण बेपत्ता, संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं थैमान! ६९ जणांचा मृत्यू, ३७ जण बेपत्ता, संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत

Follow Us
Close
Follow Us:

हिमाचल प्रदेशात यावर्षी पावसाळ्याने भीषण रौद्ररूप धारण केलं असून राज्यभरात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आहे. २० जूनपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ६९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ३७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. दरड कोसळणे, ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

मोठी बातमी! दिल्लीतील ‘जुन्या’ वाहनांवरील बंदी उठवली, मंत्री सिरसा यांनी घेतला होता आक्षेप

गुरुवारी मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर आलेल्या पुरात आणखी दोघांचा  मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून  असून मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.  जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी १० ठिकाणी ढगफुटी झाली आहे. याशिवाय तीन वेळा अचानक पूर आला. तसंच एका ठिकाणी भूस्खलन झालं. गोहर परिसरातून सात, थुनाग येथून पाच आणि करसोग उपमंडळातून एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यात १५० पेक्षा जास्त घरे पूर्णतः नष्ट झाली आहेत. १०४ जनावरांचे शेड, ३१ वाहने, १४ पूल, तसेच अनेक रस्तेही या आपत्तीत उद्ध्वस्त झाले आहेत. या आपत्तीत १६२ जनावरे मृत्युमुखी पडले. ५ राहत शिबिरे उभारण्यात आली असून फक्त मंडी जिल्ह्यात ३७० नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.

या भीषण परिस्थितीत मनाली-केलांग मार्ग बंद झाला असून वाहतूक रोहतांग परिसरातून वळवण्यात आली आहे. सीमारेषेवर असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी बीआरओ (सीमा रस्ता संघटना) कार्यरत आहे.

राज्यभरात एकूण २६१ रस्ते वाहतुकीसाठी बंद असून त्यापैकी १८६ रस्ते केवळ मंडी जिल्ह्यात आहेत. पावसामुळे राज्यातील ५९९ ट्रान्सफॉर्मर बंद पडले असून ७९७ जलपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू आणि विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी घर गमावलेल्या लोकांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

India Monsoon Alert: दिल्लीत उकाडा तर हिमाचलमध्ये आज पाऊस..; ‘या’ राज्यात तुफान बरसणार

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार एकूण नुकसान सुमारे ५०० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. ढगफुटीमुळे १४, फ्लॅश फ्लडमुळे ८ आणि प्रवाहात अडकून ७ जणांचे प्राण गेले आहेत. सध्या रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे, पण अनेकांचे संसार या पावसात अक्षरशः वाहून गेले आहेत. राज्य सरकारसमोर  दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Web Title: 69 people died 37 missing in himachal pradesh extreme heavy rain latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Himachal Pradesh
  • Himachal Pradesh News

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…
1

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
2

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच
3

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली
4

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.