देशातील अनेक राज्यांमध्ये होणार जोरदार पाऊस (फोटो- ani)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. दिल्लीत उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर देशात अन्य राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, बिहार, हरियाणा, पंजाब राज्यांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
7 जुलैपर्यन्त दिल्लीच्या वातावरणात कोणताही बदल न होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दिल्लीत मान्सून दाखल झाला आहे. मात्र पुढील काही दिवस दिल्लीत वातावरण सामान्यच राहण्याचा अंदाज आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये गेले 11 दिवस सलग पाऊस सुरू आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार
हिमाचल प्रदेशमध्ये गेले 11 दिवस सलग पाऊस सुरू आहे. मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशला पावसापासून सध्या तरी मोकळीक मिळण्याची शक्यता कमी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काय स्थिती?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज उत्तर प्रदेशमध्ये हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही.
Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक; हायवे बंद अन्…; पहा Video
केदारनाथ यात्रेत निसर्गाचा ब्रेक
काही दिवसांमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मंडी जिल्ह्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनप्रयाग-मूनकटिया भागात भुस्खलन झाले आहे.
सोनप्रयाग-मूनकटिया भागात तब्बल 40 श्रद्धाळू अडकले आहेत. मात्र एसडीआरएफने अथक प्रयत्न करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या परिसरात मुसळधार पावसामुळे अचानक भुस्खलन झाले. त्यामुळे तिथे 40 श्रद्धाळू अडकून पडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
समोर आला व्हिडिओ
रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफने 40 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. याबाबतची काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना पाहायला मिळत आहे.
Monsoon Alert: हिमाचलमध्ये पावसाचा रुद्रावतार; तब्बल 11 ठिकाणी ढगफुटी अन्…; चार दिवस अक्षरश: धुवून काढणार
यमुनोत्री हायवे बंद
यमुनोत्री येथे ढगफुटी झाल्याने हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाण ढगफुटी झाली आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आज मंडी जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाली. गेल्या काही दिवसांत 5 ते 6 वेळेस मंडी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये आतापर्यंत 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.