जम्मू काश्मीर सीमेवर हाय अलर्ट (फोटो- सोशल मीडिया)
सीमावर्ती भागात भारतीय सैन्याची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरच्या सीमेजवळ आले, पाकिस्तानी ड्रोन्स
भारतीय लष्कराने सुरू केले सर्च ऑपरेशन
पूंछ: जम्मू काश्मीर राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण जम्मू काश्मीर राज्यात आणि सीमेजवळ भारतीय यंत्रणेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पूंछ जिल्ह्यात नियत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे ड्रोन्स दिसून आले.
पूंछ जिल्ह्यात भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे. एलओसीजवळ पाकिस्तानी ड्रोन्स दिसून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. ड्रोन्स आढळून आल्यावर भारतीय लष्कर, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, आणि काश्मीर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. आढळून आलेले ड्रोन हे पाकिस्तानमधून आल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेला मोठे यश आले आहे. आज एक ड्रोन पूंच भागातील करमाडा भागात शिरले. सुरक्षा दलांनी एक बॅग जप्त केली आहे. यामध्ये ड्रोनमधून आयईडी आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
बातमी अपडेट होत आहे…






