Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

Iran Israel : इराण-इस्रायल युद्धामध्ये इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचे पडसाद भारतामध्ये देखील उमटू लागले आहेत. श्रीनगरमध्ये शिया मुस्लीमांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 12:52 PM
Srinagar Shia Muslims Mourn Khamenei Death in US-Israeli Strikes marathi news

Srinagar Shia Muslims Mourn Khamenei Death in US-Israeli Strikes marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण-इस्रायल वादाचे भारतात पडसाद
  • शिया मुस्लीमांची श्रीनगरमध्ये निदर्शने
  • अमेरिका आणि इस्रायल
Iran Israel : काश्मीर : जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ला केला आहे. या युद्धामुळे विनाशकारी हत्याकांड सुरु झाला आहे. इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराण आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धाचे पडसाद भारतामध्ये देखील पडू लागले आहे. शिया मुस्लीम बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली असून जोरदार निषेध दर्शवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये शिया मुस्लीमांनी पोस्टर घेऊन या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

 

 

अमेरिका-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच काश्मीर खोऱ्यातील लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका-इस्रायली ऑपरेशन “ऑपरेशन एपिक फ्युरी” हे येथील अनेक लोक इस्लाम आणि विशेषतः शिया मुस्लिम समुदायावरील हल्ला मानतात. या ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक इराणी नेत्यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. भारतामध्ये देखील शेकडो निदर्शक खामेनींचे मोठे फोटो आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी सतत “खामेनी चिरंजीव होवो” आणि “अमेरिका आणि इस्रायल मुर्दावाद” अशा घोषणा दिल्या, ज्या त्यांच्या तीव्र संताप आणि विरोधाचे प्रतिक आहे. काश्मीरमध्ये या हल्ल्याचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच हा हल्ला भ्याड असल्याचे देखील म्हटले आहे.

हे देखील वाचा : शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास

अमेरिका-इस्रायल हल्ल्यात अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येचा श्रीनगरमधील शिया मुस्लिमांनी निषेध केला.शिया मुस्लीमांनी आमचा नेता मारल्याचे कधी विसरणार नाही असे म्हणत शोक व्यक्त केला आहे. निदर्शकांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी जोरदार घोषणाबाजी केली, आंदोलकांनी खमेनींचे फोटो आणि इराणला पाठिंबा देणारे बॅनर घेतले होते. श्रीनगरच्या रस्त्यांवर काळे झेंडे, अयातुल्लाचे फोटो आणि पारंपारिक शोकगीते (नौहा) म्हटली जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मात्र निषेध शांततापूर्ण वातावरणामध्ये केला जात असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.

हा हल्ला केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण नाही तर

काश्मीरमधील या निदर्शनांमागे खोलवर धार्मिक आणि राजकीय कारणे जोडलेली आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांना काश्मीरमध्ये एक इस्लामिक क्रांतिकारी आणि पॅलेस्टिनी समर्थक नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी इराणने काश्मीर मुद्द्याला, विशेषतः शिया समुदाय आणि इराण समर्थकांना दीर्घकाळापासून पाठिंबा दिला आहे. भारतामध्ये देखील त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांना इस्लामिक एकता आणि शिया मुस्लिम समुदायाचे प्रतीक मानले जात होते. मात्र त्यांच्या या हत्येमुळे संर्व शिया मुस्लीम आक्रमक आणि शोकाकुळ झाले आहेत. हा हल्ला केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण नाही तर धार्मिक आणि सांप्रदायिक भावनांशी जोडलेला आहे. त्यामुळे याचे पडसाद भारतामध्ये देखील दिसून येत आहे.

हे देखील वाचा :  खामेनेईंचा अंत! मृत्यूनंतर मुलगा बनला नवा ‘सुप्रीम लीडर’? देशाची कमान घेतली हाती

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबद्दल शिया समुदायाचे नेते सय्यद समर काझमी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, “आपण पहिल्यांदाच नेता गमावला नाही, परंतु आपल्या प्रिय नेत्याचा मृत्यू आपण विसरणार नाही. अमेरिका आणि इस्रायलने आपल्या नेत्याला फसवणुकीने कसे मारले हे आपण आपल्या पिढ्यांना सांगू… मुस्लिमांचा एक भाग नेहमीच प्रिय नेत्याच्या मार्गावर राहिला आहे आणि नेहमीच म्हणतो की आपण नेहमीच अत्याचारितांसाठी आवाज उठवू… जग शांत असताना पॅलेस्टाईनमधील हत्याकांडांसाठी आवाज उठवल्यामुळेच त्याला मारण्यात आले, अशी भूमिका काश्मीरी शिया बांधवांनी घेतली आहे.

Web Title: Srinagar shia muslims mourn khamenei death in us israeli strikes marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • jammu kashmir
  • World War 3

संबंधित बातम्या

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
1

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ
2

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
3

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
4

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.