
गोव्यातील नाईट क्लबच्या दुर्घटनेचा थरारक Video आला समोर (Photo Credit - X)
🇮🇳⚡ New Footage Emerges from Arpora, Goa. A singer was performing when flames suddenly erupted from the roof. Shockingly, no visible fire safety equipment activated at the moment of the incident. The performers and staff noticed the fire just in time and rushed to safety. pic.twitter.com/OOTwrXTCZa — Osint World (@OsiOsint1) December 7, 2025
२५ जणांचा मृत्यू, एक्झिट गेट लहान पडले
काही क्षणांतच लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईट क्लबचा एक्झिट गेट (बाहेर पडण्याचा मार्ग) खूप लहान असल्याने लोकांना बाहेर पडायला वेळ लागला. त्यामुळे काही लोक किचनकडे धावले, जिथे धूर आणि आग पसरल्यामुळे अनेक लोक अडकले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. बहुतेक मृत्यू दम श्वास कोंडल्यामुळे झाले आहेत.
हे देखील वाचा: Goa Fire : गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी
क्लबकडे नव्हते NOC
मिळालेल्या रिपोर्टनुसार, या नाईट क्लबकडे आग सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (No Objection Certificate – NOC) नव्हते. क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीदरम्यान झालेल्या ‘फायर शो’मुळे (Fire Show) आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. फायर शोमधील आगीच्या ज्वालांनी लाकडी बांधकामाला त्वरित पकडले आणि धूर बेसमेंटपर्यंत पोहोचला.
नाईट क्लबच्या व्यवस्थापकाला अटक
गोवा येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (Fire and Emergency Services) संचालक, नितीन व्ही. रायकर यांनी स्पष्ट केले की, क्लबकडे आग प्रतिबंधक उपायांसाठी आवश्यक असलेले NOC नव्हते. अग्निशमन विभागाने या क्लबला काम करण्यासाठी कधीही ‘फायर NOC’ जारी केले नव्हते. दुर्घटना घडल्यानंतर नाईट क्लबच्या व्यवस्थापकाला (Manager) अटक करण्यात आली आहे.
हा नाईट क्लब २०२४ मध्येच सुरू झाला होता
उत्तर गोव्यातील एका लोकप्रिय पार्टी स्थळ असलेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये हा भीषण अपघात झाला. हे ठिकाण गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात आहे. हा नाईट क्लब २०२४ मध्येच सुरू झाला होता. घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि रेस्टॉरंट व्यवस्थापनाची वैयक्तिक चौकशी केली. पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवले आहेत. या अपघाताविषयी प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना ‘सिलेंडरचा स्फोट’ झाल्यामुळे आग लागली आणि ती क्लबमध्ये वेगाने पसरली, असा संशय आहे.