Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात ! रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सोमवारी (दि.२३) रात्री झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 07:35 AM
Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात; रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

Air Ambulance Crash : पुन्हा विमान अपघात; रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात, सातही जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सोमवारी (दि.२३) रात्री झाला असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. झारखंडच्या छत्र जिल्ह्यात हा अपघात झाला, त्यात विमानातील सातही जण मृत्युमुखी पडले आहेत. आता याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे बीचक्राफ्ट किंग एअर BE9L विमान संध्याकाळी ७:११ वाजता उड्डाण केले. मात्र, वाराणसीच्या आग्नेयेस अंदाजे १०० नॉटिकल मैल अंतरावर, सायंकाळी ७:३४ वाजता हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. त्यानंतर हा अपघात झाला. यात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची ओळख पटवली जात आहे.

हेदेखील वाचा : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! ८ संशयित दहशतवादी अटकेत; ISI कनेक्शन उघड

यात संजय कुमार (वय ४१) भाजलेले रुग्ण ज्याला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात येत होते. यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. तर विमानात असलेले इतर सहा जण पायलट कॅप्टन विवेक विकास भगत, सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, फ्लाइट अटेंडंट अर्चना देवी आणि धुरु कुमार, डॉ. विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात

या विमान अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचाव आणि शोध पथके पाठवली. विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक पथक पाठवले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे भारतातील एअर अॅम्ब्युलन्स सुरक्षा प्रोटोकॉल आणि ऑपरेशनल देखरेखीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यानुसार, नंतर याप्रकरणाची सखोल तपास करून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

हेदेखील वाचा : Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?

Web Title: Accident of air ambulance en route from ranchi to delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • Jharkhand news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.