Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे काढण्याबाबत PF चा ‘तो’ नियम कायम; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

पीएफ खात्यात अनिवार्यपणे ठेवावी लागणारी किमान शिल्लक मर्यादा २५ वरून १० टक्के करण्यात आली आहे. मात्र, पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 20, 2026 | 11:53 AM
पैसे काढण्याबाबत PF चा 'तो' नियम कायम; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

पैसे काढण्याबाबत PF चा 'तो' नियम कायम; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:
  • नोकरी गेल्यानंतर संपूर्ण PF काढण्यासाठी १२ महिन्यांऐवजी आता दोन महिने बेरोजगारीची अट.
  • PF खात्यातील किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर.
  • पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम.
नवी दिल्ली : नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफमधील पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यास मंजुरी दिली आहे. यानुसार, नोकरी सुटल्यानंतर संपूर्ण पीएफची रक्कम काढण्यासाठी आता 12 महिने नव्हे, तर केवळ दोन महिने बेरोजगार राहणे आवश्यक असेल.

याशिवाय, पीएफ खात्यात अनिवार्यपणे ठेवावी लागणारी किमान शिल्लक मर्यादा २५ वरून १० टक्के करण्यात आली आहे. मात्र, पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे. गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स, घरगुती कामगारांना पीएफ खात्यात स्वतःहून योगदान करण्याची सुविधा देण्याबाबतही चर्चा झाली. ईपीएफओच्या अंतर्गत अंदाजानुसार, ५५ वर्षपिक्षा अधिक वयाचे सुमारे ६.३२ लाख सदस्य या नव्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.

दरम्यान, या बदलांमुळे निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. मात्र, या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत आवश्यक दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. त्यानंतर नव्या सुविधा लागू होतील.

स्वतःहून योगदान करण्याची सुविधा

बदलत्या रोजगार व्यवस्थेचा विचार करून गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि घरगुती कामगारांनाही पीएफशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. या कामगारांना पीएफ खात्यात स्वतःहून योगदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर काम करणाऱ्या लाखो कामगारांना भविष्यात सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

FAQ

प्रश्न १ : नोकरी गेल्यानंतर संपूर्ण PF कधी काढता येणार?
उत्तर : नोकरी सुटल्यानंतर दोन महिने बेरोजगार राहिल्यानंतर संपूर्ण PF रक्कम काढता येणार आहे.

प्रश्न २ : PF खात्यातील किमान शिल्लक किती ठेवावी लागणार?
उत्तर : किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली आहे.

प्रश्न ३ : पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल?
उत्तर : पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे.

Web Title: After losing job you can withdraw entire pf amount in just 2 months nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • EPFO
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखोंचा जनसागर

अजित डोवाल यांच्या अडचणींत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणी अमेरिकेतील कोर्टाने दिल्लीतील कोर्टाकडे मागितली मदत
2

अजित डोवाल यांच्या अडचणींत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणी अमेरिकेतील कोर्टाने दिल्लीतील कोर्टाकडे मागितली मदत

EPFO New PF Withdrawal Rules:  नोकरी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPFO च्या ‘या’ नव्या निर्णयामुळे PF धारकांना मोठा फायदा
3

EPFO New PF Withdrawal Rules: नोकरी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! EPFO च्या ‘या’ नव्या निर्णयामुळे PF धारकांना मोठा फायदा

Ladki Bahin Yojana: लाभ बंद झाल्याने बजेट कोलमडले; ९१ लाख अपात्र महिलांच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार?
4

Ladki Bahin Yojana: लाभ बंद झाल्याने बजेट कोलमडले; ९१ लाख अपात्र महिलांच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.