Ahmedabad Plane Crash: चमत्कार म्हणावं की नशीब? विमान दुर्घटनेतून बचावला एकमेव प्रवासी, स्वतःच चालत आला अन्... VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Ahmedabad Plane Crash News Marathi: गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर या रहिवाशी भागात विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातातून १०० हून अधिक मृतदेह सापडेल आहेत. या घटनेने संपूर्ण देश हळहळून गेला आहे. एअर इंडियाच्या या विमानात १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. हे विमान प्रवाशांना घेऊन लंडनला निघाले होते. परंतु विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांनी विमानाला आग लागली आणि भीषण स्फोट झाला.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री, चांदीगड, पंजाबचे प्रभारी विजय रुपाणी यांचे निधन झाले आहे. गुजरात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी विजय रूपाणींच्या मृत्यूची माहिती दिली. शिवाय या अपघातात सर्व प्रवशांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात एक प्रवासी बचावला असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी जखमी अवस्थेत चालत येत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या या अपघातातून एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. या व्यक्तीचे नाव रमेश विश्वकुमार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालायता उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रवाशाच्या जिवंत मिळाल्याने अजून काही प्रवासी जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचाव पथक आणि अग्निशमन दलाने शोधकार्य सुरुच ठेवले आहे.
अपघातातून प्राण बचावलेल्या रमेश विश्वकुमारने घटनेचे वर्णने केले आहे. त्यांनी सांगतिले की, आमच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तीस सेंकंदाने एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. त्यांनी सांगितले की, त्याला शुद्ध आली त्यावेली त्याच्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडलेले होते. त्याने म्हटले की, मी खूप घाबरलो होतो, मी सैरावरा पळू लागलो, आजूबाजूला विमानाचे तुडके पसरलेले होते. याच वेळी मला कोणीतरी पकडले आणि रुग्णालयात घेऊन गेले.रमेशने तो ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगतिले. तो त्याच्या कुटुंबियांना भारतात भेटायला आला होता. त्यानंतर ब्रिटनला परतत असताना हा अपघात झाला.
अहमदाबाद प्लेन हादसे में सुरक्षित बचे यात्री रमेश विश्व कुमार। इनकी सीट संख्या 11A सीट थी।#planecrash #AirIndia pic.twitter.com/cOGkKpm8Bs
— आदित्य शुभम् 🇮🇳 آدتیہ شبھم Aditya Subham (@aditya_shashi) June 12, 2025
या अपघातात १२ क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगाल आणि १ कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते. या अपघातात त्यांचे निधन झाले आहे.
Fact Check: विमान कोसळतानाचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल