पैसे काढण्याबाबत PF चा 'तो' नियम कायम; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
याशिवाय, पीएफ खात्यात अनिवार्यपणे ठेवावी लागणारी किमान शिल्लक मर्यादा २५ वरून १० टक्के करण्यात आली आहे. मात्र, पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे. गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स, घरगुती कामगारांना पीएफ खात्यात स्वतःहून योगदान करण्याची सुविधा देण्याबाबतही चर्चा झाली. ईपीएफओच्या अंतर्गत अंदाजानुसार, ५५ वर्षपिक्षा अधिक वयाचे सुमारे ६.३२ लाख सदस्य या नव्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे.
दरम्यान, या बदलांमुळे निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे. मात्र, या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत आवश्यक दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. त्यानंतर नव्या सुविधा लागू होतील.
स्वतःहून योगदान करण्याची सुविधा
बदलत्या रोजगार व्यवस्थेचा विचार करून गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि घरगुती कामगारांनाही पीएफशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. या कामगारांना पीएफ खात्यात स्वतःहून योगदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर काम करणाऱ्या लाखो कामगारांना भविष्यात सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
प्रश्न १ : नोकरी गेल्यानंतर संपूर्ण PF कधी काढता येणार?
उत्तर : नोकरी सुटल्यानंतर दोन महिने बेरोजगार राहिल्यानंतर संपूर्ण PF रक्कम काढता येणार आहे.
प्रश्न २ : PF खात्यातील किमान शिल्लक किती ठेवावी लागणार?
उत्तर : किमान शिल्लक मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली आहे.
प्रश्न ३ : पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल?
उत्तर : पेन्शनची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ३६ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी कायम ठेवण्यात आला आहे.






