भारतीय वायुसेनेने अग्निवीर (Indian Air Force Agniveer) पदांच्या भरतीसाठी २४ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला असून परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहेत.
वायुसेनेच्या अग्निवीर भरतीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा ३१ जुलै रोजी पूर्ण झाली असून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २४ जून २०२२ पासून सुरू झाली आणि ५ जुलै २०२२ पर्यंत चालू होती. पहिल्या टप्प्यातील परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना आता दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. अग्नीवीर अंतर्गत भरतीसाठी ७ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण ३५०० पदे भरण्यात येणार आहेत.
भारतीय वायुसेनेने अग्निवीर पदांच्या भरतीसाठी परीक्षा दिलेले उमेदवार agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची कमाल शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहे.
उमेदवाराच्या वयाबद्दल बोलताना उमेदवाराचा जन्म २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५ दरम्यान झालेला असावा. अग्निवीर भरती परीक्षेत निवडलेल्या अर्जदारांना पीएसएल फेरीसाठी बोलावले जाणार असून दुसऱ्या टप्पयातील परीक्षा १ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे.
असा तपासा निकाल :
निकाल तपासण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
त्यानंतर होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
येथे फॉर्ममध्ये विचारलेली माहिती प्रविष्ट करून ती सबमिट करावी.
वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनवर दिसून येईल.