Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक इंजिन झालं बंद अन्…; प्राथमिक अहवालातील धक्कादायक सत्यावर Air India नी दिली प्रतिक्रिया

Air India Plane Crash Report : अहमदबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यावर आता एअर इंडियाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2025 | 11:31 AM
Air India reaction on Ahmedabad plane crash AAIB primary report News In Marathi

Air India reaction on Ahmedabad plane crash AAIB primary report News In Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Air India Plane Crash Report : नवी दिल्ली : मागील महिन्यांमध्ये अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला होता. नुकतेच उड्डाण घेतलेल्या एअर इंडियांच्या विमान कोसळले होते. यामध्ये जवळपास 270 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये विमानाने उड्डाण घेताच त्याचे इंजिन अचानक बंद झाले असा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली. यावर आता एअर इंडियाने प्रतिक्रिया दिली आहे.

एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, “तुम्ही इंधन का कमी केले?” उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, “मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

08:08:42 UTC ला विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. फक्त एका सेकंदात, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ स्थितीत हलवले. वैमानिकांनी ताबडतोब दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला आणि रिलाईट प्रक्रिया देखील सुरू झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. परिणामी विमान 08:09:11 UTC वाजता क्रॅश झाले, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Air India stands in solidarity with the families and those affected by the AI171 accident. We continue to mourn the loss and are fully committed to providing support during this difficult time.

We acknowledge receipt of the preliminary report released by the Aircraft Accident…

— Air India (@airindia) July 11, 2025

एअर इंडियाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन या अहवालावर प्रतिक्रिया दिली आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना तपास अजून सुरु असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, “एअर इंडिया AI171 अपघातामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसोबत आणि त्यांच्यासोबत एकजुटीने उभी आहे. आम्ही या नुकसानाबद्दल शोक व्यक्त करत आहोत आणि या कठीण काळात मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत.”

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“आज, १२ जुलै २०२५ रोजी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या प्राथमिक अहवालाची आम्ही दखल घेतो. एअर इंडिया नियामकांसह भागधारकांसोबत जवळून काम करत आहे. आम्ही AAIB आणि इतर अधिकाऱ्यांशी त्यांचा तपास पुढे जात असताना पूर्ण सहकार्य करत आहोत. तपासाचे सक्रिय स्वरूप पाहता, आम्ही विशिष्ट तपशीलांवर भाष्य करण्यास आणि अशा सर्व चौकशी AAIB कडे पाठवण्यास असमर्थ आहोत, अशी भूमिका एअर इंडियाने घेतली आहे.

Web Title: Air india reaction on ahmedabad plane crash aaib primary report news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • Accident Case
  • Air India. Plane Crash
  • airplane news

संबंधित बातम्या

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
1

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा
2

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान
3

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान

प्रवासी अन् एअर इंडियाची झाली चूक; जायचे होते दिल्लीला पण थेट गाठले भुवनेश्वर
4

प्रवासी अन् एअर इंडियाची झाली चूक; जायचे होते दिल्लीला पण थेट गाठले भुवनेश्वर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.