धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू
पुणे : पती-पत्नीमधील वाद हा कधी क्षणिक असतो तर काहीवेळा जीवघेणाही ठरतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात 11 बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीर आणि भावजयीचे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दीर आणि भावजयीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी महिला गेली असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून मारत होती. पण हा त्रिशूळ नवऱ्याला न लागता बाळाच्या डोक्यात घुसला. या घटनेत ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : क्रूरतेच्या सर्व सीमा पार! दोन मुलांना लैंगिक कृत्य करण्यास बळजबरी करत अत्याचार, व्हिडिओही बनवला; कारण वाचून हादराल
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कडेगावच्या आंबेगाव पुनर्वसन भागात ही धक्कादायक घटना घडली. नवरा-बायकोच्या भांडणात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, डोक्यात त्रिशूळ घुसल्यामुळे ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा; दोघांना झाली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेगावमध्ये राहणाऱ्या मेंगवडे कुटुंबामध्ये भांडण झाले, नवरा-बायकोचे टोकाचे भांडण सुरू होते. या भांडणात बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूळ फेकून मारला. हा त्रिशूल डोक्यात घुसून चिमुकल्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पुण्यात यापूर्वीही घडले अनेक गुन्हे
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. क्षुल्लक कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना काही महिन्यांपूर्वीच पुण्याच्या खराडी येथे पतीने पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने वार करून हत्या केली. इतकेच नाहीतर या हत्येचा व्हिडिओ त्याने रेकॉर्डही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.