Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP News: बलात्काराला तुम्ही स्वतःच जबाबदार! पीडितेला फटकारत अलाहाबाद न्यायालयाचा आरोपीला जामीन

घटना घडल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि नोएडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या एफआयआरनुसार ११ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 11, 2025 | 09:17 AM
UP News: बलात्काराला तुम्ही स्वतःच जबाबदार! पीडितेला फटकारत अलाहाबाद न्यायालयाचा आरोपीला जामीन
Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज: नोएडा येथे २०२४ सप्टेंबर महिन्यात झालेल्या बलात्कार प्रकरणात संबंधित पीडिताच जबाबदार असल्याचे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. महिलेने स्वतःहूनच संकटाला आमंत्रण दिले होते, अशी टिप्पणी न्यायमूर्ती संजय कुमार यांनी सुनावणीवेळी केली. ही घटना सप्टेंबर २०२४ मध्ये घडली. नोएडा येथील एका लोकप्रिय विद्यापीठाची विद्यार्थिनी तिच्या तीन मैत्रिणींसह दिल्लीतील हौज खास येथील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही ओळखीचे मित्र भेटले.

नोएडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे.की, मी दारूच्या नशेत होते. त्यामुळे आरोपी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. ३ वाजेपर्यंत आम्ही बारमध्ये होतो. तो त्याच्याबरोबर येण्यास सांगत होता. त्याच्या आग्रहास्तव मी त्याच्या घरी आराम करण्यासाठी जाण्यास तयार झाले. घरी पोहोचेपर्यंत तो मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत राहिला. तसेच, त्याच्या नोएडा येथील घरी घेऊन जाण्याऐवजी त्याने मला त्याच्या गुडगाव येथील नातेवाईकाच्या घरी नेले. तिथेच त्याने माझ्यावर बलात्कार केला, असेही पीडितेने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pakistan Ram Mandir: पाकिस्तानात बांधले जात आहे भव्य राम मंदिर! भारतातून आणली जाणार ‘ही’ खास वस्तू

सहसंमतीने झाले संबंध

घटना घडल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली आणि नोएडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या एफआयआरनुसार ११ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने आपल्या जामीन अर्जात न्यायालयाला सांगितले की, पीडितेला आरामाची गरज होती, त्यामुळे ती स्वतःच माझ्या घरी जाऊन आराम करण्यास तयार झाली.

न्यायालयाने व्यक्त केले मत

तरी, तिने स्वतःच या संकटाला आमंत्रण दिले आणि त्यासाठी ती जबाबदार होती असा निष्कर्ष काढता येतो. पीडितेने तिच्या जबाबातही अशीच भूमिका घेतली आहे. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिचे हायमेन फाटलेले आढळले, आढळले, परंतु डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबद्दल कोणतेही मत दिले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, पीडिता पदव्युत्तर वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे तिने केलेले कृत्य समजून घेण्यास ती सक्षम होती. प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता तसेच गुन्ह्याचे स्वरूप, पुरावे, आरोपीची सहभाग आणि पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे लक्षात घेता, अर्जदाराने जामिनासाठी योग्य केस तयार केली आहे असे माझे मत आहे. म्हणून, जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे.

नवीन युगात युद्धाचे स्वरूप बदलले, बदलत्या युद्धासाठी सैन्याला सज्ज राहावे लागेल : राजनाथ सिंह

Web Title: Allahabad court grants bail to accused in rape case reprimands victim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
1

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
2

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?
3

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
4

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.