Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील तीन व्यक्तींना शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 12:30 AM
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक; तब्बल 57 लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे :राज्यसह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील तीन व्यक्तींना शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूकीच्या घटना पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.

 

पहिल्या घटनेत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात मोबाईल धारक, लिंक धारक तसेच अ‍ॅप आणि बँकेच्या खाते धारकांवर आयटी अ‍ॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट २०२५ या एक महिन्याच्या कालावधीत घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार संजय पार्क येथे राहण्यास आहेत. तक्रारदारांना सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर फोनद्वारे संपर्क साधत त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखविले. एक अ‍ॅपद्वारे त्यांना शेअरर्सची माहिती देखील देण्यात आली. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी वेगवेगळ्या खात्याद्वारे एकूण ३९ लाख ७ हजार २०० रुपये पाठवले. मात्र, नंतर त्यांना परतावा किंवा मुळ रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.

दुसऱ्या घटनेत अशाच पद्धतीने एका ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चोरट्यांनी ८ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून केवळ २२ दिवसात सायबर चोरट्यांनी पैसे उकळले आहेत. तसेच, विश्रांतवाडी भागातील ४४ वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या आमिषाने ९ लाख ८ हजार ८६१ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Cyber thieves dupe three people from pune with the lure of share trading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.