Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : ‘गोळी लागली असती तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ टायगर श्रॉफ प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. लॉरेन्स बिष्णोईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 20, 2026 | 10:35 PM
uddhav thackeray on eknath shinde

uddhav thackeray on eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
  • टायगर श्रॉफ प्रकरणावरून शिंदेंना टोला
  • टायगर श्रॉफ प्रकरणावरून फडणवीसांनाही घेरलं
 

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. याच भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. (Uddhav Thackeray)

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेचा संदर्भ दिला. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफची भेट घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. ‘टायगर श्रॉफवर हल्ला झाला, हे चमकू लगेच गेले बघायला. 15 तासांत गुंड पकडले, त्याचं कौतुक करायचं की काय? जर त्या मुलाला गोळी लागली असती, तर आरोपी पकडून काय चाटायचंय?’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करणं महत्त्वाचं असलं, तरी अशा घटना घडूच नयेत यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शस्त्र घेऊन येणाऱ्या आरोपींना आधीच रोखता आलं असतं, तर परिस्थिती वेगळी असती, असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

या घटनेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली. हल्ला होण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती का, आणि अशा घटना रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाते, असे प्रश्न त्यांच्या भाषणातून उपस्थित झाले.

टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या प्रकरणात आरोपींना पकडल्याचं कौतुक करण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे, हा मुद्दा त्यांनी मांडला.

लॉरेन्स बिष्णोईच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी लॉरेन्स बिष्णोईचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बिष्णोई साबरमती कारागृहात असल्याचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

‘फडणवीसजी, तुमच्यात दम असेल तर तुमच्या बाबाकडे जा आणि घेऊन या त्या बिष्णोईला,’ अशा शब्दांत त्यांनी आव्हानात्मक टीका केली. यावेळी ‘शहरी नक्षल’ या शब्दाच्या वापरावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी टायगर श्रॉफवरील हल्ला, नागरिकांची सुरक्षा आणि लॉरेन्स बिष्णोईचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा राजकीय चर्चेत आला आहे.

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: उद्धव ठाकरे यांनी टायगर श्रॉफ प्रकरणावरून काय टीका केली?

    Ans: हल्ल्यानंतर आरोपींना अटक करण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यांनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

  • Que: उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका का केली?

    Ans: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याची भेट घेतल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून त्यांच्यावर टीका केली.

  • Que: देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी काय आरोप केला?

    Ans: लॉरेन्स बिष्णोईच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आणि बिष्णोईविरोधातील कारवाईबाबत आव्हानात्मक विधान केलं.

Web Title: Uddhav thackeray tiger shroff attack eknath shinde dasara melava vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 10:31 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • tiger shroff
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!
1

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
2

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली
3

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा
4

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.