Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले; राज्यातील भयाण दुष्काळाचे मांडले वास्तव!

Uddhav Thackeray Dasara Melava : राज्यातील भयानक परिस्थितीचे विश्लेषण करताना परभणीतील युवराज नामक मुलाची गोष्ट उद्धव ठाकरे यांनी सांगितली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचाही कंठ दाटून आल्याचं दिसले.

  • By विवेक
Updated On: Oct 20, 2026 | 09:46 PM
dasara melava uddhav thackeray (1)

dasara melava uddhav thackeray (1)

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील दुष्काळाची भयावह परिस्थिती
  • उद्धव ठाकरेंनी सांगितली परभणीच्या युवराजची कथा
  • दसरा मेळाव्यात सगळेच झाले भावुक
 

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राज्यातील दुष्काळाच्या भयानक परिस्थितीची जाणीव करून दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्रावरही निशाणा धरला. तसेच राज्यातील भयानक परिस्थितीचे विश्लेषण करताना त्यांनी परभणीतील युवराज नामक मुलाची गोष्ट सांगितली. युवराजसोबत घडलेली घटना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचाही कंठ दाटून आल्याचं दिसले. (Uddhav Thackeray Dasara Melava)

उद्धव ठाकरेंनी युवराजची कथा सांगताचाच उपस्थितांचे डोळे पाणवल्याचे दिसून आले. राज्यातील दुष्काळाच्या परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव यावेळी उपस्थितांना त्यांनी करून दिली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “हा दुष्काळ मोठा असणार आहे. आपल्याकडे दुष्काळात तेरावा महिना अशी म्हण आहे. तसंच हे सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार नुसतं घोषणा करतंय. गेल्यावर्षी अतिवृष्टीत सगळं वाहवून गेलं होत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी इतिहासातील सर्वात मोठं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होत. ज्यांची जमीन खरडून गेलीये त्यांना साडेतीन लाख रुपये हेक्टरी जाहीर केले. ते किती जणांना मिळाले? पीकविमा किती जणांना मिळाला? आतासुद्धा जी 5 हजाराची मदत केली ते उपकार नाहीत? विम्यासाठी जे निकष लावले होते ते निकषच काढून टाकले जेणेकरून नुकसानभरपाई देण्याची गरजच पडणार नाही. कर्जमाफी जाहीर झाली पण कुणाला मिळाले काहीच माहित नाही? केंद्रीय पथक येऊन गेलं काय केलं कुणालाच माहीत नाही…”

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली

उद्धव ठाकरेंनी सांगितली युवराजची गोष्ट आणि सगळेच हळहळले

ते पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांची अवस्था एवढी वाईट आहे. परभणीत झरी नावाचं एक गाव आहे. त्या झरी गावामध्ये युवराज बुधवर म्हणून एक 14 वर्षाचा पोरगा होता. शाळेतही सहल होती म्हणून हा युवराज त्याच्या बाबाच्या पाठी लागला. बाबा शेतकरी.. त्यांनी सांगितलं आपलं सोयाबीन विकल्यावर पॆसे येतील त्यातून तुला कपडे घेऊन सहलीला पाठवू. पण त्या पोराने पाहिलं सोयाबीन सुकलं आहे. मग ते विकणार कसं? आणि पैसे येणार कुठून? म्हणून दुपारी घरी कोणी नसताना छताला साडीचा फास करून गळफास घेऊन आत्महत्या केली. नवीन कपडे बाप आपल्या मुलाला देऊ शकत नाही. कल्पना करा, जी साडी नेसल्यानंतर आई म्हणून जिला तो बिलगत होता, त्याच साडीचा गळफास केलेले आपल्या पोराला बघून त्या आईबापाच्या मनात काय झालं असेल. पण कोणी गेलं नाही त्याच्याकडे बघायला.” उद्धव ठाकरेंनी हि परिस्थिती सांगताच त्यांचाही कंठ दाटून आला. तसेच, उपस्थित लोकांचेही डोळे पाणवल्याचे दिसून आले.

“हा माझ्या महाराष्ट्रातील गरीब शेतकरी. इथले गरीब शेतकरी असे जगतात आणि त्यांची पोर अशी मरतात. त्या युवराजने कधी खेळण्यातलं हेलिकॉप्टरपण घेतलं नसेल पण आमच्याकडचं गरीब शेतकऱ्याचं पोर पंचतारांकित शेतात हेलिकॉप्टर उडवत जातं. काय थोतांड चाललंय?” असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टोला मारला.

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा मुख्य मुद्दा काय आहे?

    Ans: ठाकरे गटाकडून यंदाचा मेळावा संविधानाच्या संरक्षणार्थ आहे.

  • Que: उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात कोणत्या मुलाची कहाणी सांगितली?

    Ans: उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील झरी गावातील युवराज बुधवर या 14 वर्षीय मुलाची कहाणी सांगितली.

  • Que: उद्धव ठाकरे यांनी दुष्काळावरून सरकारवर काय टीका केली?

    Ans: त्यांनी शेतकऱ्यांना जाहीर झालेली नुकसानभरपाई, पीकविमा, पाच हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफी प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, असे प्रश्न उपस्थित केले.

Web Title: Uddhav thackeray dasara melava parbhani yuvraj story vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
1

Shivsena Eknath Shinde Dasara Melava : तरुणाईचा वापर करून भाषणं ठोकतायंत; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली
2

Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live : कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा.., ठाकरेंची तोफ धडाडली

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा
3

Dasara Melava 2026 : दसरा मेळाव्यात मोठा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात येणार राज ठाकरे? सेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर
4

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.