Independence Day 2025: भारत ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, लष्कराने सीमेवर, विशेषतः नियंत्रण रेषेवर (LOC), दक्षता वाढवली आहे. कोणतीही घुसखोरी किंवा दहशतवादी घटना टाळण्यासाठी लष्कराने ३-स्तरीय सुरक्षा ग्रिड तयार केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार गावात हे रोबोटिक घुसखोरीविरोधी ग्रिड बसवण्यात आले आहे.
भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियंत्रण रेषेवर शून्य घुसखोरी सुनिश्चित करण्याचे काम सैनिकांना देण्यात आले आहे. सीमेवर तैनात असलेले सैनिक म्हणून, आमचे काम या भागात शून्य घुसखोरी स्थापित करणे, देखभाल करणे आणि सुनिश्चित करणे आहे. या सुरक्षा कवचाचे मुख्य उद्दिष्ट शून्य घुसखोरी सुनिश्चित करणे हे आहे.
हा पहिला स्तर आहे, ज्यात अत्याधुनिक पाळत ठेवणाऱ्या उपकरणांचा वापर केला जातो. यात रडार, थर्मल इमेजिंग साइट्स, शस्त्रे आणि हेल्मेटवर बसवलेले कॅमेरे, तसेच मानवरहित हवाई वाहने (UAV) यांचा समावेश आहे. या उपकरणांच्या मदतीने शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जाते.
दुसरा स्तर म्हणजे विविध प्रकारचे अडथळे. यामध्ये भूसुरुंग (landmines) आणि इतर ऑप्टिकल प्रणालींचा समावेश आहे. शत्रू भारतात घुसखोरी करण्यापूर्वीच या अडथळ्यांमुळे त्यांना रोखले जाते.
तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तर म्हणजे लष्कराचे जवान. हे जवान नेहमीच कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार असतात. ते नियमितपणे गस्त घालतात आणि शत्रूचा थेट मुकाबला करण्यासाठी सज्ज असतात. याशिवाय, भारतीय सैन्यात आता स्मार्ट कुंपण प्रणाली, क्वाडकॉप्टर, अत्याधुनिक पाळत ठेवण्याची साधने, बुलेटप्रूफ वाहने आणि आधुनिक शस्त्रे यांसारख्या नवीन उपकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे सीमेवरील सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी देखील लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा ध्वज फडकवणार आहेत आणि जनतेला संबोधित करण्यात आहेत. यावेळी हजारो लोक त्या क्षणाचे साक्षीदार असतील. तसेच हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो. तुम्हाला देखील या क्षणाचा साक्षीदार व्हायचे असेल आणि लाल किल्ल्यावरील सोहळा समोरासमोर पहायचा असेल तर तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. या सोहळ्याचे तिकीट बुक करणे सरकारने अधिक सोपे बनवले आहे. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करायची आहे आणि काही क्षणातच तुमची तिकिटे बुक होतील.
तुम्ही 13 ऑगस्टपासून रक्षा मंत्रालयची वेबसाइट [aamantran.mod.gov.in](https://aamantran.mod.gov.in) किंवा [e-invitations.mod.gov.in](https://e-invitations.mod.gov.in) या वेबसाईटला भेट देऊन तुमची तिकिटेबुक करू शकता आणि या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होऊ शकता.