Independece Day 2025 : स्वातंत्र्याचे ७८ वं कि ७९ वं वर्ष... यावेळी देश कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे? जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Indepedence Day 2025 : नवी दिल्ली : दरवर्षी आपण १५ ऑगस्टला आपल्या भारताचे स्वातंत्र्य उत्साहाने साजरे करतो. या दिवशी संपूर्ण देशात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. संपूर्ण शहर देशभक्तीमध्ये गुंग झालेले असते. लाल किल्ल्यापासून ते गावा गावांच्या चौकापर्यंत तिरंगा फडकवला जातो. यादिवशी १९४७ मध्ये आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सुटका मिळली होती.
हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतीवीरांचा आठवण करुन देतो. यावेळी शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये झेंडा फडकवला जातो. सर्वत्र जलेबी, बर्फी यांसारख्या मिठाईचे वाटप केले जाते.
पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून नेमकी किती वर्ष झाली असा गोंधळ लोकांच्या मनात नेहमी निर्माण होत असतो. यावेळी देखील तुमच्या मनात असाच गोंधळ उडत असेल. यावेळी आपण नेमका कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत ७८ वा कि ७९ वा असा प्रश्न तुम्ही सर्वांना पडला असेल. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत, तेही अगदी सोप्या शब्दात.
Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
यंदा आपण स्वातंत्र्याचा ७८ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहोत. यामुळे हा ७९ वा स्वातंत्र्यदिन असेल. याकाळात आपल्या देशाने एक मजबूत लोकशाहीचा पाया उभारला आहे. शेतीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपण सकारात्मक बदल घडवला आहे. अनेक अडचणींवर मात करुन आपण शन्यूपासून शिखरापर्यंत पोहोचलो आहोत.