Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha यांची जागा घेणारे कोण आहेत अशोक कुमार मित्तल? कोट्यवधींची संपत्ती अन् शैक्षणिक पार्श्वभूमी

Ashok Kumar Mittal : आप पक्षाने राघव चड्ढा यांच्याकडून उपनेतेपद काढून टाकले आहे. यानंतर आता अशोक कुमार मित्तल हे त्यांच्याजागी उपनेते पदी असणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 02, 2026 | 03:14 PM
Ashok Kumar Mittal to replace Raghav Chadha as AAP Deputy Leader in the Rajya Sabha

Ashok Kumar Mittal to replace Raghav Chadha as AAP Deputy Leader in the Rajya Sabha

Follow Us
Close
Follow Us:

Ashok Kumar Mittal : नवी दिल्ली : संसदेमध्ये आम आदमी पक्षाची (AAP) भूमिका मांडणारे आणि जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणारे म्हणून खासदार राघव चड्ढा यांची ओळख होती. मात्र पक्षाने त्यांच्याकडून अचानक जबाबदारी काढून घेतल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. आप पक्षाने राघव चड्ढा यांच्याकडून उपनेतेपद काढून घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्याऐवजी आपने अशोक कुमार मित्तल यांना संधी देण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीने (आप) राज्यसभेतील उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांना हटवून एक मोठा संघटनात्मक बदल केला आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक अधिकृत पत्र सादर केले आहे. ‘आप’ने सचिवालयाला असेही कळवले आहे की, राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नये. हा निर्णय पक्षाचा अंतर्गत धोरणात्मक बदल म्हणून पाहिला जात आहे, मात्र त्यामागील सविस्तर कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. तसेच खासदार राघव यांना कोणती नवी जबाबदारी देण्यात आली आहे का याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

अशोक मित्तल कोण आहेत?

खासदार राघव चड्ढांऐवजी नियुक्त करण्यात आलेले डॉ. अशोक मित्तल हे पंजाबचे राज्यसभा खासदार असून देशातील अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते भारतातील अग्रगण्य खाजगी विद्यापीठांपैकी एक असलेल्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (LPU) कुलपती देखील आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना एक प्रभावशाली शैक्षणिक नेते म्हणून ओळख मिळाली आहे आणि आता ते राजकारणातही सक्रिय भूमिका बजावत आहेत.

अशोक मित्तल यांचा जन्म १० सप्टेंबर १९६४ रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्यांनी गुरु नानक देव विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आणि ते व्यवसायाने एक उद्योजक आहेत. त्यांनी पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (LPU) संस्थापक कुलपती म्हणूनही काम केले आहे. त्यांनी परराष्ट्र व्यवहार समिती, वित्त समिती आणि संरक्षण समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

हे देखील वाचा : राघव चड्ढांना राज्यसभा उपनेतेपदावरुन हटवले, बोलण्यावरही मर्यादा; नेमकं काय आहे कारण?

मित्तल यांच्या वेबसाइटनुसार, त्यांना इंडियन रेड क्रॉस पुरस्कार, पंजाब गौरव पुरस्कार, शिक्षा रत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) आकडेवारीनुसार, आप खासदार अशोक मित्तल यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. मित्तल यांच्याकडे ९१ कोटी रुपयांपेक्षा जास्त (अंदाजे १.९ अब्ज डॉलर्स) किमतीची मालमत्ता आहे.

Web Title: Ashok kumar mittal to replace raghav chadha as aap deputy leader in the rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • AAP
  • AAP Arvind Kejriwal
  • Raghav Chadha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.