Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

Assam News : आसाममधील दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात संशोधकांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. अत्यंत दुर्मीळ आणि कमी अभ्यास झालेल्या समूहातील परजीवी गांधीलमाशीची नवी प्रजाती येथे आढळून आली असून, तिची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 12:15 PM
भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

भारतात पहिल्यांदाच नोंद! आसामच्या दिब्रू-सैखोवा जंगलात सापडली गांधीलमाशीची दुर्मिळ प्रजाती

Follow Us
Follow Us:
  • आसामच्या जंगलात सापडली परजीवी गांधीलमाशीची नवी प्रजाती
  • अवघ्या ३.३ मिलिमीटरच्या या कीटकाची खास वैशिष्ट्ये कोणती?
  • दिवंगत संशोधकाच्या सन्मानार्थ प्रजातीला देण्यात आले खास नाव
आसाममधील दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या (झेडएसआय) संशोधकांना परजीवी गांधीलमाशीची एक नवी प्रजाती आढळून आली आहे. ‘ऑक्सिसर्फस नरेंद्रानी’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. ओरिएंटल जैवभौगोलिक प्रदेशात या दुर्मीळ गटातील कीटकाची अधिकृत नोंद प्रथमच झाली आहे. संशोधक रुपम देबनाथ आणि केलोथ राजमोहन यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये दिन्न-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात पिवळ्या रंगाच्या पाण्याने भरलेल्या ताटलीचा सापळा लावला होता.

Sugar Price : साखरेची किंमत ‘या’ गोष्टींवर ठरते; नितीन गडकरींनी सांगितले कृषी उत्पादनांच्या किमतीचे रहस्य

कीटकांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या साध्या सापळ्यात मिळालेल्या नमुन्याची नंतर सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करण्यात आली. त्यातून हा कीटक प्रॉक्टोटुपिडी या परजीवी गांधीलमाशीच्या कुळातील आजवर अज्ञात प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. या गांधीलमाशांचा गट ‘डार्क टॅक्सा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यल्प अभ्यास झालेल्या जीवसमूहात मोडतो. ऑक्सिस्पस या प्रजातीतील कीटक जगभरातील संग्रहांमध्ये अत्यंत दुर्मीळ आहेत.

ऑक्सिसर्फस नरेंद्रानीचे वैशिष्ट्ये

अवघी ३.३ मिलिमीटर लांबी असलेल्या या गांधीलमाशीचे डोके काळे, शरीर तपकिरी-काळे आणि पाय उठावदार पिवळ्या रंगाचे आहेत. परजीवी गांधीलमाशांच्या प्रजाती एकमेकांसारख्या दिसत असल्याने तिची ओळख पटविण्यासाठी शरीररचनेतील सूक्ष्म वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. संशोधकांना या प्रजातीच्या छातीच्या बाजूला एकच आडवा चर आढळला. यामुळे ती ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. भारतीय प्रजातीचा अंडे घालण्याचा अवयवही तुलनेने लहान असून पंखावरील ठिपक्याचा आकारही वेगळा आहे.

Congress Criticized SIR Program: SIRमध्ये ७.८ कोटी मतदारांची नावे वगळली; काँग्रेसचा गंभीर आरोप

नरेंद्रन नाव का?

  • नव्या प्रजातीला भारतातील परजीवी गांधीलमाशांच्या अभ्यासासाठी मोठे योगदान देणारे दिवंगत डॉ. टी. सी. नरेंद्रन यांच्या सन्मानार्थं ‘ऑक्सिसर्फस नरेंद्रानी’ हे नाव देण्यात आले आहे.
  • या शोधापूर्वी भारतात या कुळातील केवळ आठ प्रजातींची नोंद होती.
  • देशातील विविध अधिवासामध्ये आणखी व्यापक सर्वेक्षण केल्यास कीटकांच्या जैवविविधतेतील अनेक अज्ञात प्रजाती समोर येण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Assam dibru saikhowa national park new parasitic wasp species oxysarphus narendrani zsi discovery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Assam
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
1

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
3

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
4

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.