Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० दिवसांत पुरावे द्या नाहीतर देशाबाहेर निघा; ‘या’ राज्यात नागरिकत्वाबाबत मोठा निर्णय

संशयित परदेशी नागरिकांना त्यांचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी फक्त १० दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. यानंतर योग्य कारवाई केली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2025 | 01:54 PM
Assam government gives suspected foreign nationals just 10 days to prove their Indian citizenship

Assam government gives suspected foreign nationals just 10 days to prove their Indian citizenship

Follow Us
Close
Follow Us:

दिसपुर : हिमंता बिस्वा सर्मा सरकारने संशयित परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्याबाबत एक मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. आसाम राज्यामध्ये नागरिकत्वाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी (दि.09) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक नवीन मानक कार्यप्रणाली (एसओपी) मंजूर करण्यात आली आहे. या अंतर्गत संशयित परदेशी नागरिकांना त्यांचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी फक्त १० दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार आहे. या निर्णयानंतर, नागरिकत्व निश्चितीच्या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा आयुक्तांना महत्त्वाचे अधिकार देण्यात आले आहेत, जे आतापर्यंत परदेशी न्यायाधिकरणांकडे होते.

या नवीन नियमामुळे राज्य सरकारला स्थलांतरित (आसाममधून हकालपट्टी) कायदा, १९५० प्रभावीपणे अंमलात आणण्याचा अधिकार मिळतो. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले की, जर सीमा पोलिसांकडून किंवा इतर कोणत्याही स्रोताकडून एखादी व्यक्ती परदेशी असल्याची माहिती मिळाली तर जिल्हा उपायुक्त त्याला नोटीस बजावतील. जर १० दिवसांच्या आत दिलेली कागदपत्रे समाधानकारक आढळली नाहीत, तर उपायुक्त विलंब न करता हकालपट्टीचा आदेश जारी करतील, त्यानंतर त्या व्यक्तीला डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाईल.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

परदेशी न्यायाधिकरणांची भूमिका संपली का?

मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी स्पष्ट केले की या नवीन SOP च्या अंमलबजावणीमुळे, राज्यातील परदेशी न्यायाधिकरणांची भूमिका मोठ्या प्रमाणात निष्प्रभ होईल. आतापर्यंत संशयित परदेशी लोकांचे खटले या न्यायाधिकरणांकडे जात असत, जिथे प्रक्रिया लांब होती. नवीन नियमानुसार, फक्त तेच खटले न्यायाधिकरणांकडे पाठवले जातील जिथे जिल्हा दंडाधिकारी ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या मते, “जर उपायुक्त दिलेले कागदपत्रे समाधानी नसतील तर ते थेट बाहेर काढण्याचे आदेश देतील. त्या व्यक्तीला डिटेंशन सेंटरमध्ये नेले जाईल, तेथून BSF त्याला बांगलादेश किंवा पाकिस्तानला परत पाठवेल.”

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नेहरू सरकारचा ७५ वर्षे जुना कायदा

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने बनवलेल्या स्थलांतरित (आसाममधून हकालपट्टी) कायदा, १९५० (आयईएए) अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानातून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आसाम सरकारच्या दबावाखाली हा कायदा आणण्यात आला होता. या कायद्यानुसार, जर केंद्र सरकारला असे वाटत असेल की बाहेरील व्यक्तीचे आसाममध्ये राहणे देशाच्या किंवा स्थानिक जमातींच्या हितासाठी हानिकारक आहे, तर त्याला हाकलून लावण्याचा आदेश जारी केला जाऊ शकतो. तथापि, त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री गोपीनाथ बारदोलोई यांना लियाकत-नेहरू करारामुळे ते थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आणि तेव्हापासून हा कायदा थंडबस्त्यात होता.

Web Title: Assam government gives suspected foreign nationals just 10 days to prove their indian citizenship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Assam
  • Assam News
  • daily news

संबंधित बातम्या

चेअरमन नविद मुश्रीफ माझे भाऊ…त्यांच्या विरोधात कशी जाऊ? शौमिका महाडिक यांची भावनिक साद
1

चेअरमन नविद मुश्रीफ माझे भाऊ…त्यांच्या विरोधात कशी जाऊ? शौमिका महाडिक यांची भावनिक साद

सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणि महाप्रसादासाठी थेट काढली सरकारी नोटीस; अजब अधिकाऱ्याची गजब कहानी
2

सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणि महाप्रसादासाठी थेट काढली सरकारी नोटीस; अजब अधिकाऱ्याची गजब कहानी

MP village Lake stolen : मध्यप्रदेशात घडली अजब गोष्ट! चक्क गावातील तलावची झाली चोरी, 25 लाख रुपये गेले पाण्यात
3

MP village Lake stolen : मध्यप्रदेशात घडली अजब गोष्ट! चक्क गावातील तलावची झाली चोरी, 25 लाख रुपये गेले पाण्यात

टॅरिफ वॉरमध्ये उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न; महाराष्ट्र राज्य सरकारकडून कामांचे तास वाढवून 10 तास करण्याचा प्रस्ताव
4

टॅरिफ वॉरमध्ये उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न; महाराष्ट्र राज्य सरकारकडून कामांचे तास वाढवून 10 तास करण्याचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.