समृद्धी महामार्गावरील व्हिडिओचे सत्य काय (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई ते नागपूर दरम्यान आहे समृद्धी महामार्ग
शेकडो खिळे ठोकल्याचा प्रकार आला समोर
व्हिडिओमधील नेमके सत्य काय?
Samruddhi Highway Viral Video: महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी असलेल्या नागपूरमधील प्रवासाचा वेग कमी व्हावा व विकासासाठी त्याचा फायदा व्हावा, यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गावरून रोज शेकडो वाहने प्रवास करत आहेत. मात्र सध्या या महामार्गावर शेकडो खिळे ठोकल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेमके या व्हिडिओमागचे सत्य काय आहे ते, जाणून घेऊयात.
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर शेकडो खिळे ठोकल्याचा एक व्हिडिओ समोर येत आहे. महामार्गावर सगळीकडे खिळेच खिळे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेकडो खिळे असे रस्त्यावर ठोकल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची लूट करणे किंवा चोरीच्या उद्देशाने ही खिळे ठोकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आता प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमागचे नेमके सत्य काय आहे हे जाणून घेऊयात. दरम्यान एका व्हिडिओतून हा दौलताबाद या भागातील असल्याचे दिसून येत आहे. चोरीच्या उद्देशाने ही खिळे ठोकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय?
समृद्धी महामार्गावर शेकडो खिळे ठोकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने हे केल्याचा संशय होता. ब्रिजवर विशिष्ट पद्धतीने ठोकलेल्या खिळ्यांमुळे गाड्या पंक्चर झाल्या आहेत. मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकल्याचे म्हटले जात आहे. रस्त्याच्या कामासाठी खिळे ठोकल्याचे झाले उघड झाले आहे. त्यामुळे आता प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच असे काम करणाऱ्या कंपनीवर व त्यातील लोकांवर कारवाई करण्याची मागणी एलि जात आहे.
समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त
समृद्धी महामार्गावर 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची नोंद
वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. असे असले तरी सात महिन्यात ८४ अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजना, वाहन मालकांचे समुपदेशन आणि इतर गोष्टींमुळे समृद्धीवरील अपघातांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.