
Avimukteshwaranand Saraswati chariot at the confluence of rivers On Mauni Amavasya UP News
या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेमध्ये समर्थकांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या, शंकराचार्यांचा रथ थांबवण्यात आल्याने अनेकांनी ही धर्म विरोधी घटना असल्याचे म्हटले आहे. यानंतर आता अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : भाजपचे नेतृत्व आता बिहारकडे? राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नवीन दाखल करणार अर्ज
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना संगम स्नान नाकारल्याने उत्तर प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत शंकराचार्य मौन धरले असून उपवास करत असल्याची माहिती समोर येत आहेत. रविवारी घडलेल्या घटनेपासून स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अन्न-पाणी सोडल्याचा दावा केला जात आहे. ते सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांची पुढची रणनीती जाहीर करू शकतात. दरम्यान, माघ मेळा परिसरात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी थांबवल्याचा मुद्दा रविवारी दिवसभर चर्चेत राहिला. याबाबत चर्चा सुरूच होत्या. पोलिस-प्रशासनाने त्यांची पालखी थांबवल्यापासून शंकराचार्यांचा संताप भडकला आहे.
हे देखील वाचा : नक्षलवाद्यांनो खबरदार! छत्तीसगडच्या ‘या’ जिल्ह्यात चकमकीचा थरार; Armed Forces ने 6 जणांना थेट…
पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मेळा परिसर “नो-व्हेइकल झोन” म्हणून घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे मोठ्या ताफ्यांना किंवा वाहनांना पुढे जाण्याची परवानगी नाही. दरम्यान, शंकराचार्य यांना संगम तीरावर जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी ताफ्याला थांबवले तेव्हा समर्थक आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की पोलिस आणि शंकराचार्यांचे शिष्य यांच्यात धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी समर्थकांना मागे ढकलले, ज्यामुळे संतांमध्ये व्यापक संताप निर्माण झाला.
पोलीस प्रशासनाचे म्हणणे काय?
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या ताफ्याबाबत संगम अजूनही तणावपूर्ण आहे. सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून मेळा प्रशासनाने माध्यम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की शंकराचार्य यांनी पायी जाण्याची विनंती केली होती, परंतु ताफ्याचे अनुयायी दर्शनासाठी धावले, ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते. पूर्वपरवानगीशिवाय रथातून प्रवास करण्याची परवानगी देता येणार नाही असे विभागीय आयुक्त सौम्या अग्रवाल यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने असेही म्हटले आहे की ताफ्याच्या पदयात्रेदरम्यान कोणतेही अनुचित वर्तन किंवा सुरक्षेत त्रुटी राहू दिल्या जाणार नाहीत.