छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवादी ठार (फोटो- सोशल मीडिया)
छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान
बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दले व नक्षलवाद्यांमध्ये चकमक
चकमकीत कॅडरचा देखील मृत्यू
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात बिजापूरच्या जंगलात मोठी चकमक झाली. सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कॅडर आणि बक्षीस असलेल्यांसा समावेश आहे.
बिजापूरमधील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर कठोर कारवाई केली. जिल्हा पोलिस दल, विशेष कार्य दल, कोब्रा कमांडो यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दले यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीला नक्षलवादी प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. यामध्ये 6 नक्षलवादी ठार झाले.
चकमक झाल्यावर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला. या चकमकीत 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी हत्यारांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये एके-47 रायफल्स, एक कार्बाइन असा साठा जप्त करण्यात आला आहे. यावरून नक्षलवादी मोठा कट रचत होते असे समोर आले आहे.
नक्षलवाद संपणार! CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान; ‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान
आज देशभरात सर्वत्र नाताळ साजरा केला जात आहे. दरम्यान ओडीशा राज्यात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले. ओडीशामध्ये आज एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत कम्युनिस्ट सेंट्रल कमिटी (मावोइस्ट)चा टॉप कमांडर गणेश उडकेला कंठस्नान घातले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. नक्षलवाद नष्ट करण्याच्या मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
६९ वर्षीय कमांडर गानेश्वर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत गणेशसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. ओडीशा पोलिसांचे नक्षलवादी ऑपरेशनचे डीआयजी यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली.
अंत होने वाला है! ‘या’ राज्यात तब्बल 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; प्रत्येकावर होते 1 लाखांचे बक्षीस
ओडीशा स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ, बीएसएफच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली आहे. कंधमाल आणि गंजम जिल्ह्यातील झालेल्या कारवाईत गणेशला कंठस्नान घालण्यात आले. त्याच्यावर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये तीन नक्षलवादी ठार झाले. ज्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.






