
Mohan Bhagwat
RSS Chief Mohan Bhagwat News: “भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. कोणत्याही श्रद्धा असोत, भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि त्यांचे पूर्वजदेखील हिंदू आहेत.” असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. संघ प्रमुख भागवत बेंगळुरूमध्ये “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे: नवीन क्षितिजे” या विषयावर बोलत होते. आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
मोहन भागवत म्हणाले, “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे आणि त्याचे पूर्वज हिंदू आहेत. आरएसएस कधीही सत्तेची इच्छा करत नाही. तर हिंदू समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि भारतमातेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
“जेव्हा आरएसएस’सारखी संघटित शक्ती उदयास येते तेव्हा ती सत्ता मिळवण्याची इच्छा ठेवत नाही. ती समाजात प्रमुखता शोधत नाही. ती फक्त भारतमातेच्या गौरवासाठी सेवा करते, समाजाचे संघटन करते. आपल्या देशातील लोकांना पूर्वी यावर विश्वास ठेवणे खूप कठीण वाटत होते. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही.” असही भागवत यांनी नमुद केलं.
मोहन भागवत म्हणाले, “जेव्हा आरएसएस म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवणे नसून भारतमातेच्या फायद्यासाठी समाजाला एकत्र आणणे असतो. लोकांना एकेकाळी आरएसएसच्या उद्देशावर शंका होती, परंतु आता त्यांनाही ते समजले आहे.”
भागवत म्हणाले, “ब्रिटिशांनी आपल्याला एक राष्ट्र बनवले नाही, तर प्राचीन काळापासून भारत एक राष्ट्र आहे. सर्व देशांची एक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे, भारताचीदेखील संस्कृती हिंदू आहे. आपण स्वतःला काहीही म्हणत असलो तरी आपली ओळख नेहमी हिंदू अशीच राहील. मुस्लिम असोत किंवा ख्रिश्चन, आपण सर्व एकाच संस्कृतीतून आलो आहोत आणि आमचे पूर्वज एकच आहेत. प्रत्यक्षात, भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चनांना त्यांची मुळे विसरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत.”
मनोज जरांगेंच्या अडचणींत होणार वाढ; ‘या’ कारणामुळे मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
भागवत म्हणाले, ” भारतात कोणीही गैर-हिंदू नाही. प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे की ते हिंदू आहेत, कारण याचा अर्थ भारताचे जबाबदार नागरिक असणे आहे. भारत एक हिंदू राष्ट्र आहे आणि संविधान याचा विरोध करत नाही. सनातन धर्म आणि भारत वेगळे करता येत नाहीत. म्हणून, सनातन धर्माची प्रगती ही भारताची प्रगती आहे.
मोहन भागवत म्हणाले की, “आरएसएस हिंदू समाजावर लक्ष केंद्रित का करते?” या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, “हिंदूच भारतासाठी जबाबदार आहेत. ब्रिटिशांनी आपल्याला राष्ट्रीयत्व दिलेले नाही. आपण स्वतः एक प्राचीन राष्ट्र आहोत. जगातील सर्वजण मान्य करतात की प्रत्येक राष्ट्राची स्वतःची एक मूळ संस्कृती असते. देशात अनेक रहिवासी असले तरी मूळ संस्कृती एकच असते. भारताची ती मूळ संस्कृती कोणती आहे, असा प्रश्न पडतो, आणि त्याचे उत्तर ‘हिंदू’ या शब्दात सापडते.”