नवी दिल्ली – पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्हीआयपी संस्कृती रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केला आहे. यापुढे आमदार मंत्री आणि अधिकाऱ्यांनी महागड्या आणि आलिशान हॉटेल्सऐवजी सरकारी गेस्ट हाउसमध्ये राहावे, असे नवीन आदेशात म्हटले आहे. या आदेशाने येथील व्हीआयपी कल्चरवर बंदी येणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीतील खर्च देखील कमी होणार आहे.
मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी सर्किट हाऊससह अन्य सरकारी गेस्ट हाऊस बांधण्यात आल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. तरीही मंत्री, आमदार, अधिकारी खासगी हॉटेलमध्ये मुक्काम करतात. त्यामुळे तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडत आहे. कोणताही मंत्री, आमदार आणि अधिकारी मैदानात गेल्यावर त्यांना सर्किट हाऊस किंवा सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहावे लागेल, असे सीएम मान यांनी म्हटले आहे.
यापूर्वी भगवंत मान सरकारवर व्हीआयपी कल्चरवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमाही खराब झाली आहे. यावरही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. भगवंत मान सरकारच्या या निर्णयामुळे पक्षाची आता प्रतिमा सुधारणार आहे