Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत जोडो यात्रा 2.0 लवकरच; 13 नोव्हेंबरपासून भोपाळमधून सुरू होण्याची शक्यता

  • By युवराज भगत
Updated On: Nov 07, 2023 | 04:01 PM
Bharat Jodo Yatra 2.0

Bharat Jodo Yatra 2.0

Follow Us
Close
Follow Us:

Rahul Gandhi Padayatra : आगामी लोकसभा निवडणुका 2024 ला होणार आहेत त्याच बरोबर आता सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची (Legislative Assembly Elections 2023) रणधुमाळी सुरू आहे. अशातच मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगढ (Chhattisgarh), राजस्थान (Rajasthan), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी 2024 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला (BJP) पराभूत करण्याच्या हेतूने काँग्रेसने (Congress) कंबर कसली असून निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली होती आणि त्याचा फायदा पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाल्याचे दिसले. अशातच आता राहुल गांधी लवकरच ‘भारत जोडो’ यात्रेचा (Bharat Jodo Yatra) दुसरा टप्पा सुरू करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत.

मध्य प्रदेशात प्रचारासाठी राहुल गांधींचे कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात राहुल गांधींच्या आगामी कार्यक्रमांबद्दल बोलायचं झालं तर उद्या म्हणजेच, बुधवारी (8 नोव्हेंबर) ते अंबिकापूर, छत्तीसगड येथे असतील. यानंतर 9 नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील जबलपूर, 10 नोव्हेंबरला सतना आणि 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये कार्यक्रम आहे.

‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा वेगळा असणार?
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली होती आणि 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ती यात्रा संपवली होती. भारत जोडो यात्रा 2.0 या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होऊ शकते आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत म्हणजे, तब्बल तीन महिने सुरू राहील. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल, असेही बोलले जात आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी संपूर्ण प्रवास पायी केला होता, तर यावेळी कुठे पायी आणि कुठे गाडीने प्रवास पूर्ण करणार आहेत.

Web Title: Bharat jodo yatra 2 0 is likely to start from bhopal soon from november 13 nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2023 | 04:01 PM

Topics:  

  • Assembly Elections
  • Lok Sabha Election

संबंधित बातम्या

Bihar Election : नितीश यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली; चिराग पासवान यांच्यासाठी भाजपचा डाव?
1

Bihar Election : नितीश यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली; चिराग पासवान यांच्यासाठी भाजपचा डाव?

Chirag Paswan : चिराग पासवान यांची मोठी घोषणा; बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढवणार
2

Chirag Paswan : चिराग पासवान यांची मोठी घोषणा; बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागा लढवणार

Bihar Election : तरुण मतदार ठरवणार बिहारचं राजकीय भविष्य? बिहारच्या राजकारणावर तरुणांचा किती प्रभाव? वाचा सविस्तर
3

Bihar Election : तरुण मतदार ठरवणार बिहारचं राजकीय भविष्य? बिहारच्या राजकारणावर तरुणांचा किती प्रभाव? वाचा सविस्तर

Bihar Election 2025 : या ११ जागा ठरवणार बिहारचं राजकीय भवितव्य; गेल्या निवडणुकीत ठरल्या होत्या गेम चेंजर
4

Bihar Election 2025 : या ११ जागा ठरवणार बिहारचं राजकीय भवितव्य; गेल्या निवडणुकीत ठरल्या होत्या गेम चेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.