'भारत हे फक्त एक नाव नाही तर..; देशाच्या नावावरून सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान
भारत हे फक्त एक नाव नाही, तर देशाची ओळख आहे. ते एक विशेषनाम आहे आणि त्याचे भाषांतर करू नये. ‘इंडिया म्हणजेच भारत आहे’ असं म्हणणं ठीक आहे, पण भारत, भारत आहे. म्हणून, लिहिताना आणि बोलताना, आपण भारताला फक्त भारत म्हटलं पाहिजे. भारत भारतच राहिला पाहिजे. त्यात कोणताही बदल होऊ नये, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागव यांनी व्यक्त केलं आहे.
ज्ञान सभा’ या राष्ट्रीय शिक्षण चर्चासत्रात त्यांनी हे विधान केलं आहे. भारत, भारतचं राहिला पाहिजे, त्याचं कोणत्याही संदर्भात भाषांतर किंवा रूपांतर केले जाऊ नये. असं त्यांनी म्हटलं आहे.
“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
मोहन भागवत पुढे म्हणाले की, जागतिक आदर भारतीय असण्यात आहे. जर एखाद्या राष्ट्राची खरी ओळख गमावली तर त्याच्याकडे कितीही क्षमता असली तरी त्याला आदर आणि सुरक्षा मिळत नाही. जर तुम्ही तुमची ओळख गमावली तर तुमच्याकडे कितीही प्रतिभा असली तरी तुम्हाला जगात आदर किंवा सुरक्षा मिळणार नाही. हा सार्वत्रिक नियम आहे.”
मोहन भागवत म्हणाले- भारताने कधीही कोणाच्या भूमीवर कब्जा केलेला नाही. भारताने कधीही विस्तारवादी किंवा शोषणकारी धोरण स्वीकारले नाही. विकसित भारत, विश्वगुरू भारत कधीही युद्धाचे कारण बनणार नाही आणि कधीही कोणाचे शोषण करणार नाही. आम्ही मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत लहान बोटींमध्ये पायी गेलो, पण कधीही कोणाची जमीन ताब्यात घेतली नाही, कधीही कोणाचे राज्य हिसकावून घेतले नाही. आम्ही तिथे सर्वांना सभ्यता शिकवण्यासाठी पाय ठेवला होता, असं त्यांनी म्हटलं आहे.
भारताच्या ज्ञानपरंपरेचा आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ सारख्या विचारांचा उल्लेख करत ते म्हणाले की भारताची संस्कृती सत्य आणि वैश्विक एकतेवर आधारित आहे.
मोहन भागवत यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेबद्दलही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षण हे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याशी जोडलं पाहिजे आणि मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था स्वीकारली पाहिजे. शिक्षणाचे एक छोटेसं उद्दिष्ट हे देखील असले पाहिजे की एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकेल.”
मोहन भागवत यांनी महर्षी अरविंद यांच्या विचारांचा हवाला देत म्हटले की, “योगी अरविंद म्हणाले होते की सनातन धर्माचा उदय व्हावा ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी हिंदू राष्ट्राचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. आजच्या जगाला या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. म्हणून, प्रथम आपण भारत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.” भारताचे भविष्य त्याच्या शिक्षण व्यवस्थेला त्याच्या सभ्यतेच्या वारशाशी आणि राष्ट्रीय ओळखीशी जोडल्याशिवाय सुरक्षित असू शकत नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं आहे.