helicopter (फोटो सौजन्य : social media)
केदारनाथ : रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामकडे जात असलेल्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण ६ प्रवासी होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असतांना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. अपघातानंतर रेस्क्यू पथक ताडाईने घटनांसाठी पोहोचले. बचावकार्य त्यांनी सुरु केले आहे. या अपघाताचे मुख्य कारण समोर आले आहे.
Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीतील इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दलाच्या तब्बल…
अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गौरीकुंड- सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यात कमी झाली होती. यामुळे हेलिकॅप्टरचे नियंत्रण सुटले आणि ते जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे 6 भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे. मृतांमध्ये पायलट आणि उत्तर भारतातून आलेले भाविक प्रवासी यांचा समावेश आहे.
हा हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होता. यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होत असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे.
1. राजवीर-वैमानिक
2. विक्रम रावत (बीकेटीसी रहिवासी रासी उखीमठ)
3. विनोद
4. तृष्टि सिंह
5. राजकुमार
6. श्रद्धा
7. राशि
#UPDATE | The helicopter that went missing in Gaurikund has crashed. There were six people on board the crashed helicopter. More details awaited: Uttarakhand ADG Law and Order, Dr V Murugeshan https://t.co/vDaSNjtSva
— ANI (@ANI) June 15, 2025
मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केले दुःख
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबद्दल अतिशय दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बाबा केदार यांना प्रार्थना करतो.