Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा

इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिला आहे. ऑपरेशनल संकट आणि DGCA कडून झालेल्या दंडात्मक कारवाईनंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 08:07 PM
IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा (Photo Credit- X)

IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • IndiGo मध्ये मोठी उलथापालथ!
  • CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा
  • राहुल भाटियांकडे जबाबदारी
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो (IndiGo) मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पीटर एल्बर्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंडिगोची मूळ कंपनी ‘इंटरग्लोब एव्हिएशन’ने मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला. एल्बर्स यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने लागू झाला असून, एअरलाइन उद्योगातील ही या वर्षातील सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे.

राहुल भाटियांकडे हंगामी धुरा

नव्या सीईओंची नियुक्ती होईपर्यंत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) राहुल भाटिया अंतरिम स्वरूपात एअरलाइनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतील. पीटर एल्बर्स यांनी २०२२ मध्ये इंडिगोच्या सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इंडिगोच्या जागतिक विस्तारासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही महिन्यांतील आव्हाने त्यांच्यासाठी कठीण ठरली.

IndiGo CEO Pieter Elbers resigned ​from his ​position with immediate ⁠effect for personal ​reasons, months ​after mass flight cancellations left tens of ​thousands of ​passengers stranded and drew ‌regulatory ⁠scrutiny. The airline said its managing director, Rahul Bhatia… pic.twitter.com/HHYD3xWJz3 — ANI (@ANI) March 10, 2026

इतिहासातील सर्वात मोठे ‘ऑपरेशनल संकट’ नडले?

पीटर एल्बर्स यांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वी इंडिगोला त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या तांत्रिक आणि ऑपरेशनल संकटाचा सामना करावा लागला होता. डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीला वैमानिकांच्या नवीन ड्युटी नियमांमुळे (FDTL) इंडिगोच्या शेकडो विमान फेऱ्या रद्द झाल्या होत्या किंवा विलंबाने धावत होत्या. या गोंधळामुळे देशभरातील हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर कंपनीवर प्रचंड टीका झाली होती.

Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

DGCA ची कठोर कारवाई आणि दंड

या संकटानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोची सखोल चौकशी केली होती. या चौकशीत त्रुटी आढळल्याने नियामक मंडळाने इंडिगोवर २२.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, कंपनीला ५० कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. तसेच, भविष्यात असा गोंधळ टाळण्यासाठी इंडिगोच्या ‘विंटर फ्लाइट प्रोग्राम’मध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात आली होती.

नव्या नेतृत्वाचा शोध सुरू

ऑपरेशनल यंत्रणा स्थिर करण्यात आलेल्या अपयशामुळे आणि वाढत्या कायदेशीर दबावामुळे एल्बर्स यांनी पदत्याग केल्याची चर्चा उद्योग वर्तुळात आहे. इंडिगोने आता नवीन सक्षम नेतृत्वाचा शोध सुरू केला आहे. तोपर्यंत राहुल भाटियांच्या नेतृत्वाखाली कंपनी आपले कामकाज सुरू ठेवणार आहे.

Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Web Title: Big upheaval in indigo ceo pieter elbers resigns abruptly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • IndiGo
  • indigo news

संबंधित बातम्या

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का
1

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.