Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Assembly Election 2025: अभिनेता पवन सिंह बिहार विधानसभेच्या मैदानात; भाजपच्या बड्या नेत्यांशी भेटीगाठींना वेग

भोजपूर प्रदेशात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता पवन सिंह यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी सामान्य जनतेमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2025 | 12:58 PM
Bihar Assembly Election 2025

Bihar Assembly Election 2025

Follow Us
Close
Follow Us:
  • गायक पवन सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
  • वन सिंह आज उपेंद्र कुशवाहा यांची भेट घेणार
  • आरा विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व

Bihar Assembly Election 2025:  बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या सगळ्यात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि गायक पवन सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने पवन सिंह आज (३० सप्टेंबर) सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Share Market Today: सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 24,700 चा टप्पा; ग्राहकोपयोगी वस्तू आणि मेटल शेअर्स

एनडीएचे दीर्घकाळ समर्थक असलेले पवन सिंह यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पण त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे पवन सिंह आज उपेंद्र कुशवाहा यांची भेट घेणार आहेत. बिहारच्या २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत पवन सिंह आरा विधानसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवारी मिळवण्यासाठी ही भेट घेत असल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या हालचालीही वाढल्या आहेत. त्यामुळे पवन सिंह राजकीय मंचावर आपली उपस्थिती दाखविण्यास सज्ज आहेत.

पवन सिंह आरा येथून निवडणुकीच्या मैदानाच

गेल्या २५ वर्षांपैकी २० वर्षांपासून आरा विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. भोजपूर प्रदेशातील हा तोच भाग आहे जिथे २००० मध्ये भाजपने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर अमरेंद्र प्रताप सिंह येथून सलग विजयी झाले आणि २०२० मध्ये त्यांनी पाचव्यांदा आरा येथून विजयी झाले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की पवन सिंह येथून निवडणूक लढवल्याने ही जागा आणखी मनोरंजक होईल.

आरा विधानसभा लढाई होणार रोमांचक

भोजपूर प्रदेशात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता पवन सिंह यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी सामान्य जनतेमध्ये विशेष स्थान निर्माण केले असून, राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यास पक्षाला, विशेषतः चित्रपट आणि स्टार पॉवरशी संबंधित मतदारांमध्ये, निवडणूक फायद्याची शक्यता दिसत आहे.

Bank Scam: फेरफार करून कृत्रिमरित्या वाढवल्या शेअर्सच्या किमती; खाजगी बँकेत २००० कोटींचा घोटाळा उघड

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा राजकारणात सहभाग ही नवीन बाब नाही. यापूर्वी मनोज तिवारी, रवी किशन आणि निरहुआ यांसारखे कलाकार सक्रियपणे राजकारणात उतरले असून, त्यांच्या लोकप्रियतेचा निवडणूक निकालांवर महत्त्वाचा परिणाम दिसून आला आहे.

राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की पवन सिंह यांची एनडीए उमेदवारी आरा विधानसभा मतदारसंघातील लढाई आणखी रोमांचक करेल. या जागेवर एनडीए आणि विरोधी पक्ष दोन्ही आपली संपूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पवन सिंह यांची उपेंद्र कुशवाहा यांच्याशी झालेली भेट आगामी विधानसभा निवडणुकीसंबंधी महत्त्वाचे संकेत देते.

 

Web Title: Bihar assembly election 2025 actor pawan singh to contest bihar assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025

संबंधित बातम्या

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
1

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र
2

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र

Bihar Election Survey 2025: बिहार निवडणुकीचे काय असतील निकाल? तीन दिग्गजांची भविष्यवाणी
3

Bihar Election Survey 2025: बिहार निवडणुकीचे काय असतील निकाल? तीन दिग्गजांची भविष्यवाणी

Bihar Politics: ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय..; बिहारच्या बड्या नेत्याचा आरोपाने खळबळ
4

Bihar Politics: ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय..; बिहारच्या बड्या नेत्याचा आरोपाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.