Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र

काँग्रेस सरकार आले तर "माई बहन सन्मान योजने" अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत, विधवा, वृद्ध आणि अपंगांना २५०० रुपयांची मासिक पेन्शन आणि सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरून बेरोजगारी दूर करतील. असही प्रियांका गांधींनी यावे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 27, 2025 | 12:53 PM
Priyanka Gandhi @ X

Priyanka Gandhi @ X

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रियांका गांधी  बिहारच्या दौऱ्यावर
  • चंपारणमधून थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला
  • बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले

Priyanka Gandhi criticized PM Narendra Modi:बिहारची विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी, बिहारचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेनंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्यासोबत बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रियांका गांधींनी बिहारच्या महिलांच्या खात्यात हजार रुपये जमा करणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेवरून निशाणा साधला आहे.

काल पूर्व चंपारणमधील मोतिहारी येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी बिहारच्या महिलांचे या योजनेकडे लक्ष वेधत राज्य सरकारची ही योजना केवळ निवडणूक जिंकण्याची चाल असल्याची टिका केली आहे. ” निवडणुका येत आहेत हे खरे आहे. आता पाहा कशा कशा घोषणा होतील. काल परवा बिहारमधील महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मग गेल्या वीस वर्षांत तुमचीच सत्ता होती मगा आजच जाग का आली, वीस वर्षांत कधीही महिलांनी १० हजार रुपयांची घोषणा केली नाही. मग आजच का देत आहेत. तुमच्य मतांसाठी देत आहेत. निवडणुका संपुद्यात ही योजनाही संपून जाईल. आता एक काम करा, ते १० हजार रुपये देत असतील तर घ्या, पण तुमचं मतदान देशासाठी करा. या धरतीसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा. असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Bank Holiday October 2025: ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बँक करणार नाही काम, आताच करून घ्या महिन्याचे प्लॅनिंग

प्रियांका गांधी म्हणाल्या, खूप झालं यांचं आता, संघर्ष तुम्ही करणार, पण तुम्हाला काहीच मिळत नाही. आपल्या समजुतीने सर्व पक्षांना ओळखायला शिका. मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगते. काँग्रेसने महाआघाडीने असं ठरवलं आहे की, आम्ही तुम्हाला दरमहिन्याला २५०० रुपये देणार. पण माझ्याकडून हे काम नाही झालं तर मला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही ती दिली पाहिजे. मग तुम्हीच ठरवा, यांनी किती खोटी आश्वासने दिली. शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत किती खोटी वचने दिली, मग यांना आता धडा शिकवा, यांची नियत तुम्हाला कळली पाहिजे.

माझा भाऊ आहे म्हणून बोलत नाही पण माझा भाऊ खरा देशभक्त आहे. म्हणून तो ४ हजार किलोमीटर पर्यंत चालू शकतो. गरीब आणि उपेक्षितांच्या वेदना फक्त तेच समजण्यासाठी ते आज प्रत्येक भागात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. उद्या जर जर काँग्रेस सरकार स्थापन झाले तर गरीबांसाठी उपक्षितांसाठी आम्हाला काय योजना आखता येऊ शकतात. यासाठी ते आज प्रत्येकाला भेटत आहेत. काँग्रेस सरकार आले तर “माई बहन सन्मान योजने” अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत, विधवा, वृद्ध आणि अपंगांना २५०० रुपयांची मासिक पेन्शन आणि सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरून बेरोजगारी दूर करतील. असही प्रियांका गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्य सरकारकडून जनतेसाठी दिवाळी भेट; ऑक्टोबरमध्ये वीज बिलांमध्ये कपात तर गॅस सिलेंडरही मिळणार मोफत

खरे देशभक्त चोरी करून सत्तेत येत नाहीत. खरे देशभक्त जनतेला खोटी आश्वासने देत नाहीत. खरे देशभक्त फक्त निवडणुकांसाठी, मतदानासाठी जनतेशी संपर्क करत नाहीत. तर नियत समजा, राहुलजी सामाजिक न्यायासाठी लढत आहेत. अतिउपेक्षित, शेतकरी, महिलांसाठी लढत आहेत. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, मग ते महात्मा गांधीजी असोत, वा आमच्या कुटुंबातील पूर्वज असोत, किंवा तुमच्या कुटुंबातील पूर्वजांनी बलिदान दिलेले असोत, ते बलिदान यासाठी दिले होते. न्यायासाठी ही बलिदाने दिली गेली आहेत.

म्हणून काँग्रेस पक्ष तुमच्यााठी काम करत आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. मोठमोठ्या गप्पा मारण सोपं आहे. पण खरं काम करणं खूप अवघड आहे. काँग्रेस पक्षाने तुम्हाला हे काम करून दाखवलं आहे. काँग्रेस सत्तेत असताना बिहारमध्ये किती पूल बांधले गेले. पण तुम्हीच सांगा गेल्या तीन वर्षात किती पूल पडले. २७ पूल पडले ३ वर्षात.

पंतप्रधान मोदीजी येतात. तुमच्यासमोर विकासाचे पॅकेज खोलतात, पण तुमच्याकडून एक पूल होऊ शकत नाही, तर तुम्ही विकासपुरूष कसे झालात. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काम करणारा, आणि विकास करणारा कोण आहे आणि मोठमोठी आश्वासने देणारा कोण आहे. बिहारचे ७०,००० हजार कोटीं गायब झाले. CAG चा रिपोर्ट आला, मग हे पैसे कुठे गेले, ते पैसे तुमच्या योजनांसाठीचे पैसे होते. दलित, मागासवर्गांतील लोकांसाठी योजनांचे पैसे होते. पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचलच नाहीत. दहा वर्षात हे काहीच करू शकले नाहीत. अशी टिकाही प्रियांका गांधींनी यावेळी केली.

Web Title: Priyanka gandhi criticizes the prime minister from champaran asking where bihars 70 thousand crores have disappeared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025
  • PM Narendra Modi
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: हवालदिल बळीराजाला केंद्र मदत करणार; फडणवीस-मोदी भेटीत नेमके काय घडले?
1

Devendra Fadnavis: हवालदिल बळीराजाला केंद्र मदत करणार; फडणवीस-मोदी भेटीत नेमके काय घडले?

बहीण-भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची वादग्रस्त टीका; म्हणाले, “विरोधी पक्षनेते बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस..”
2

बहीण-भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची वादग्रस्त टीका; म्हणाले, “विरोधी पक्षनेते बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस..”

Bihar Election 2025: बिहारमध्ये गेमचेंजर ठरणार ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’; काय आहेत यामागची समीकरणे?
3

Bihar Election 2025: बिहारमध्ये गेमचेंजर ठरणार ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’; काय आहेत यामागची समीकरणे?

India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल
4

India Russia US: युक्रेनबाबत काय योजना आहे? संशयाच्या सावटाखाली Modi-Putin यांच्यात फोन कॉल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.