बिहारमध्ये NDA मध्ये मोठी फूट! 'या' पक्षाने आघाडी तोडण्याची देली धमकी (Photo Credit- X)
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) जागावाटपाचा तिढा सुटला आहे. नाराज नेत्यांची समजूत काढल्यानंतर हे जागावाटप निश्चित झाले आहे. यानुसार, भाजप (BJP) आणि जनता दल (युनायटेड) (JDU) हे दोन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर आरएलएम (RLM) आणि एचएएमने (HAM) प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) २९ जागा लढवणार आहे. पण आता भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील NDA जोरदार धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
NDA चा घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत थेट १५३ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.
सुभासपाचे राष्ट्रीय प्रमुख महासचिव राजभर यांनी सोमवारी (१३ ऑक्टोबर) सांगितले की, NDA ने बिहार निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा दिली नाही. त्यामुळे आता त्यांचा पक्ष बिहारमध्ये १५३ जागांवर निवडणूक लढवेल. या सर्व उमेदवारांची घोषणा आज, मंगळवारी पाटणा येथे पत्रकार परिषद घेऊन केली जाईल.
ओम प्रकाश राजभर म्हणाले की, “आम्ही १९ वर्षांपासून बिहारमध्ये आमचे संघटन वाढवत आहोत आणि उत्तर प्रदेशात आम्ही NDA सोबत आहोत, म्हणून बिहारमध्येही आम्ही युतीला बळकट करण्याचा प्रयत्न केला.” मात्र, बिहारमधील भाजपच्या स्थानिक संघटनेने सुभासपाबद्दल विपरीत अहवाल दिला, ज्यामुळे NDA ने आम्हाला एकही जागा दिली नाही.
राजभर म्हणाले, “आम्ही याबद्दल खूप दिवसांपासून बोलत होतो. १ मे रोजी आम्ही गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही ही बाब सांगितली होती. आम्ही कालपर्यंत प्रतीक्षा केली, पण आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. त्यामुळे आम्ही आता १५३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.“
सुभासपाला राष्ट्रीय जनता दलाकडून (RJD) पाच जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव आला होता, तो पक्षाच्या नेतृत्वाने नाकारला आहे. अरविंद राजभर यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि तेज प्रताप यादव यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात राजभर यांनी स्पष्ट केले की, ते उत्तर प्रदेशमध्ये NDA सोबत कायम राहतील. बिहारमधील निवडणुकीबद्दल ते म्हणाले, “आम्ही बिहारमध्ये कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी जात नाही आहोत. आम्ही फक्त आमची मतं एकत्र करू. कोणी हारो किंवा जिंकू, याची आम्हाला पर्वा नाही.“
बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम:
प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची दुसरी यादी जाहीर, 66 उमेदवारांना देण्यात आली तिकिटे