Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election Result: बिहारमध्ये दोन दशकांत राजकीय समीकरणे कशी बदलली? भाजप-जेडीयूच्या विजयाची १५ कारणे

मोदी, अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री—सर्वांनी जोरदार सभा घेतल्या. दुसरीकडे महागठबंधनचा प्रचार इतका सुयोजित आणि व्यापक नव्हता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 15, 2025 | 10:46 AM
Bihar Election Result: बिहारमध्ये दोन दशकांत राजकीय समीकरणे कशी बदलली?  भाजप-जेडीयूच्या विजयाची १५ कारणे
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू चा ऐतिहासिक विजय
  • भाजपने पटनातील सात जागांवर वर्चस्व
  • एनडीएच्या विजयाची प्रमुख कारणं

Patna Politics:  बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू चा ऐतिहासिक विजय झाला. या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या तर जेडीयूने ८५ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. तर महाआघाडीतील इतर पक्षांना २८ जागा मिळाल्या. भाजप प्रणित महाआघाडीचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. पण सन २००५ ते २०२५ या वीस वर्षांच्या कालखंडात पाटणा जिल्ह्यातील १४ विधानसभा मतदारसंघांच्या निकालांचे विश्लेषण करता जिल्ह्याचे राजकारण मोठ्या बदलातून गेल्याचे स्पष्ट दिसून येते. या काळात नवीन राजकीय समीकरणांची उभारणी झाली असून मतदारांच्या पसंतीतही अनेकदा बदल झाले आहेत.

भाजपने पटनातील सात जागांवर वर्चस्व राखत गेल्या दोन दशकांत तीन वेळा निम्म्या जागांवर विजय मिळवला आहे. २००५ मध्ये भाजपने सात जागा मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. २०१० मध्ये सहा जागा, २०१५ मध्ये पुन्हा सात जागा आणि २०२० मध्ये पाच जागांवर विजय मिळवत पक्षाने आपली मजबूत पकड कायम ठेवली. या बदलत्या ट्रेंडमुळे पाटणा जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्येही चुरस वाढण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

बिहार म्हणजे नितीश कुमार—असा संदेश देणारे बॅनर्स पाटणा शहरात सर्वत्र झळकत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र सांगण्यासाठी ही पोस्टर्स जणू पुरेशी आहेत. तेजस्वी यादवांनी निवडणूक मोहिमेत मोठी हवा निर्माण केली होती. मात्र, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या जोडीने अशी कमाल साधली की एनडीएचा आकडा तब्बल 200 च्या पुढे गेला.

Maharashtra Politics: ‘या’ जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी; निवडणुकीच्या आधी कोंडी सोडवण्याचे आव्हान

एनडीएच्या विजयाची प्रमुख कारणं – सविस्तर विश्लेषण

1) मोदी–नितीश कुमार जोडीवरील लोकांचा विश्वास

बिहारच्या मतदारांच्या मनात ही जोडी “स्थिर, अनुभवी आणि शासनक्षम” म्हणून उभी राहिली. मोदींची राष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियता + नितीश यांचा स्थानिक अनुभव या संयोगाचा थेट फायदा एनडीएला झाला.

2) ‘डबल इंजिन सरकार’चा प्रभावी प्रचार

केंद्र आणि राज्य अशा दुहेरी सत्तेमुळे योजनांची अंमलबजावणी जलद होते, ही भावना लोकांमध्ये रुजवण्यात भाजप यशस्वी ठरला. गरीब, महिला आणि ग्रामीण मतदारांपर्यंत हा संदेश ताकदीने पोहोचला.

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

3) भाजप–जदयूचं काटेकोर नियोजन

जागावाटपासून बूथ मॅनेजमेंटपर्यंत दोन्ही पक्षांनी जवळपास ‘मायक्रो मॅनेजमेंट’ पद्धतीने प्रचार राबवला. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांचा स्वतंत्र अभ्यास आणि त्यानुसार रणनीती आखली गेली.

4) महिलांना थेट लाभ देणाऱ्या योजनांची ताकद

महिलांच्या खात्यांतील 10 हजार रुपये, 1.5 कोटी महिलांना रोजगार योजनांचा लाभ,‘लाडकी बहीण’ योजनेचा सलग तिसरा टप्पा, डीबीटीद्वारे लाभ थेट खात्यात, महिला मतदारांची वाढलेली उपस्थिती, या सर्व घटकांनी महिला मतदारांचा स्पष्ट कल एनडीएकडे वळवला.

5) 125 युनिट मोफत वीज

सर्वसामान्य कुटुंबांना थेट दिलासा देणारी योजना, ग्रामीण, गरीब, खालच्या मध्यमवर्गीय मतदारांत विशेष प्रभाव.

6) ‘जंगलराज’ची भीती यशस्वीपणे पुढे नेली

राबडी-लालू युगातील कायदा-सुव्यवस्थेची नकारात्मक आठवण भाजपने प्रभावीपणे वापरली. मतदारांनी “स्थैर्य विरुद्ध अराजकता” अशा चौकटीत मतदान केल्याचे संकेत.

7) मित्रपक्ष व्यवस्थापनात यश

HAM, LJP (चिराग गट), इतर लहान जातीय गटांना सोबत ठेवून भाजपा-जदयूने मोठा सामाजिक आधार तयार केला. चिराग आणि मांझी यांचं सोशल इंजिनिअरिंग काही मतदारसंघात निर्णायक ठरलं.

8) मोठ्या प्रमाणावर केंद्रीय यंत्रणेचा प्रचार

मोदी, अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री—सर्वांनी जोरदार सभा घेतल्या. दुसरीकडे महागठबंधनचा प्रचार इतका सुयोजित आणि व्यापक नव्हता.

9) विनोद तावडे यांचे संघटनात्मक काम

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दोन-दीड वर्षांपासून प्रत्येक मतदारसंघात खोलवर जाऊन संघटना तयार केली. यामुळे भाजपचे ‘ग्राउंड कनेक्ट’ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले.

10) दिल्ली स्फोटाचा संभाव्य परिणाम

दुसऱ्या टप्प्यापर्यंत सुरक्षा, दहशतवादसंबंधी मुद्दे मतदारांच्या मनात आले. एनडीएने याचा फायदा घेत “केंद्र मजबूत असलं पाहिजे” ही भावना निर्माण केली.

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

तेजस्वी यादवांनी 200 सभा घेऊनही महायुतीचा पराभवाची कारणे काय?

१) ‘हवा’ होती, पण संघटन कमकुवत

तेजस्वी यादवांच्या सभांना गर्दी होती, पण ती मतदानात रूपांतर करण्याचे नेटवर्क RJD–काँग्रेसकडे कमी पडले.

२) जातीय समिकरण पुरेसे ठरले नाही

महागठबंधनाने MY (मुस्लिम–यादव) समीकरणावर जास्त भर दिला. जवळपास 20 वर्षांनंतर बिहारची राजकीय रचना अधिक व्यापक झाली आहे; इतर जातींना पर्याय हवा होता.

३) नेतृत्वावर शंका

नितीश कुमारांच्या तुलनेत तेजस्वींच्या प्रशासकीय क्षमतेबाबत मतदार संशयात होते.

४) काँग्रेसचा कमकुवत प्रदर्शन

काँग्रेसने उमेदवार निवड, प्रचार, संघटन या सर्व पातळ्यांवर अपेक्षित ताकद दाखवली नाही.

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून

५) ‘जंगलराज’ प्रतिमेपासून मुक्ती नाही

RJDच्या पूर्वीच्या काळाबद्दलची भीती आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात—भाजपने हे मुद्दाम अधोरेखित केले.

६) महिलांमध्ये मर्यादित स्वीकार

मद्यबंदी, सायकल-योजना, LPG, DBT—या सर्व गोष्टींनी महिलांमध्ये एनडीएबद्दल सकारात्मक भाव निर्माण केला.
महागठबंधनला या वर्गात शिरकाव करता आला नाही.

 

 

Web Title: Bihar election result major changes in the political equation in bihar in two decades 15 reasons for bjp jdus victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • Bihar Assembly Election Result
  • Bihar Poliltics
  • BJP Politics

संबंधित बातम्या

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर
1

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
2

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
3

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Bihar Election : ‘बिहारने दिलेला जनादेश हा मोदींवरील विश्वासाचा शिक्का’, डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
4

Bihar Election : ‘बिहारने दिलेला जनादेश हा मोदींवरील विश्वासाचा शिक्का’, डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.