Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar New CM : ‘मैं अब जा रहा हूं’, नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली राजीनाम्याची घोषणा, आता पुढचा मुख्यमंत्री कोण?

आजचा दिवस बिहारसाठी महत्त्वाचा आहे. आज केवळ नितीश कुमार यांच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळच नाही, तर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या २० वर्षांच्या कार्यकाळाचाही शेवट होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2026 | 03:39 PM
'मैं अब जा रहा हूं', नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली राजीनाम्याची घोषणा, आता पुढचा मुख्यमंत्री कोण?

'मैं अब जा रहा हूं', नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली राजीनाम्याची घोषणा, आता पुढचा मुख्यमंत्री कोण?

Follow Us
Follow Us:
  • नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली राजीनाम्याची घोषणा
  • आता पुढचा मुख्यमंत्री कोण?
  • बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
Bihar New CM News Marathi: बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजनाम्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार यांच्या राजनाम्यानंतर आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच.

बिहारचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय काही तासांतच होणार आहे. आज (14 एप्रिल) नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली जाईल. मात्र, हा उत्तराधिकारी कोण असेल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दुपारी ३ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल. मात्र दुपारी ४ वाजता होणाऱ्या एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत औपचारिक घोषणा केली जाईल.

ED on Vinesh Chandel : बंगालच्या निवडणुकीपूर्वी ED चा दणका; I-PAC सह-संस्थापक विनेश चंदेल यांना अटक

निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार?

नवीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबाबतचे चित्र काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु नवीन मुख्यमंत्र्यांसोबत मंत्र्यांच्या नावाबाबतही अटकळ वाढली आहे. सध्याच्या नितीश कुमार मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांसह, अनेक संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र, निशांत कुमार, उपमुख्यमंत्री बनण्याबाबतही चर्चा तीव्र झाली आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, यावेळी बिहारच्या नवीन सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री नसतील, तर निशांत कुमार यांच्या रूपाने फक्त एकच उपमुख्यमंत्री असेल. सध्या, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री आहेत.

‘अकार्यक्षम’ मंत्र्यांना हटवणे?

बिहारच्या नवीन सरकारमध्ये भाजपमधील काही नवीन चेहरे मंत्री बनण्याची शक्यताही आहे. भाजप आपल्या कोट्यातील काही ‘अकार्यक्षम’ मंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना आणू शकते, अशी अटकळ आहे. मात्र ते चेहरे कोण असतील याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय, नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती आणि राज्यसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेली जागा एका प्रभावशाली नवीन चेहऱ्याद्वारे भरली जाण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांचा राजीनामा जाहीर…

नितीश कुमार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राजीनामा जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, “मी आता जात आहे, पण माझे मार्गदर्शन सुरूच राहील.” आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात भावूक झालेल्या नितीश कुमार यांनी सांगितले, “मी २००५ मध्ये सत्तेवर आलो, माझ्याकडून जे काही करता आले ते मी केले आणि नवीन सरकारला माझे मार्गदर्शन मिळत राहील.” विजय चौधरी आणि सम्राट चौधरी यांनीही उपस्थितांना संबोधित करून नितीश कुमार यांच्या दोन दशकांच्या कार्यकाळाबद्दल त्यांचे आभार मानले.

Noida Protest : कर्मचाऱ्यांच्या हिंसक आंदोलनांनंतर आली सरकारला जाग! नोएडामध्ये किमान वेतनात २१% वाढ जाहीर

Web Title: Bihar nitish kumar resign new govt oath ceremony 15 april samrat choudhary nityanand rai nishant kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • bihar
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

Nepal Flash Floods Impact : नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये चिंता का निर्माण वाढते? जाणून घ्या
2

Nepal Flash Floods Impact : नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये चिंता का निर्माण वाढते? जाणून घ्या

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
3

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

आईच्या निधनानंतर बापच बनला हैवान; दीड वर्षापासून लेकीवर लैंगिक अत्याचार, अखेर पाप उघडकीस’
4

आईच्या निधनानंतर बापच बनला हैवान; दीड वर्षापासून लेकीवर लैंगिक अत्याचार, अखेर पाप उघडकीस’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.