
Viral Video Controversy, Girdhari Lal Sahu Statement
मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता भंडारी हत्याकांडावरून उत्तराखंडमधील भाजप सरकारवर आधीच विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याच्या पतीने केलेल्या विधानामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एका कॅबिनेट मंत्र्याच्या पतीने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
या विधानावर प्रतिक्रिया देताना विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. असे मत केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, महिलांबाबत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेचे ते प्रतिबिंब आहे. या प्रकरणामुळे सरकारची महिला सुरक्षेबाबतची भूमिका पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे.” अशी टिका विरोधकांकडून केली जात आहे.
संबंधित व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने या विधानाला महिलाविरोधी विचारसरणीचे प्रतीक असल्याचे सांगत भाजपवर तीव्र हल्ला चढवला. “महिला सक्षमीकरणाची जबाबदारी असलेल्या मंत्र्याच्या कुटुंबातून अशी भाषा येत असेल, तर असे सरकार महिलांच्या सुरक्षितते आणि सन्मानाबाबत कसे बोलू शकते?” असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुजाता पाल यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत त्याला “पूर्णपणे लज्जास्पद” असल्याची टिका केला आहे. गिरीधारीलाल साहू यांच्या या विधानातून भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खरे विचार समोर येतात. अंकिता भंडारी प्रकरणात सरकारचे अपयश आधीच उघड झाले असून, अशा प्रकारच्या विधानांमुळे सरकारची असंवेदनशीलता अधिकच स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, काँग्रेसने भाजप नेतृत्वाने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गिर्धारी लाल साहू हे म्हणताना ऐकू येतात की, “बिहारमध्ये २०–२५ हजार रुपयांना मुली मिळतात. आम्ही बिहारमधून बॅचलरसाठी मुली आणू.” हे विधान २३ डिसेंबर रोजी अल्मोडा जिल्ह्यातील सोमेश्वर विधानसभा मतदारसंघातील सह्यादेवी मंडळात आयोजित कार्यक्रमादरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमात साहू उपस्थित होते. या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. अनेकांनी साहू यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे विधान महिलांच्या सन्मानाचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. महिलांना वस्तूसारखे पाहण्याची आणि खरेदी-विक्रीच्या भाषेत मांडण्याची ही मानसिकता असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
सुनकर सिर पीट लोगे, मंत्री पति कह रहे है बिहार में महिलाएँ पैसों में मिलती है !!
उत्तराखंड सरकार की मंत्री रेखा आर्या के पति गिरधारी लाल साहू ने माइक हाथ में आते ही मंच से बिहार की महिलाओं की क़ीमत तय कर दी। सुनिए क्या कहा,,
“शादी के लिए बिहार से 20-25 हज़ार में महिला मिल जाती… pic.twitter.com/Hx40HofPXq — Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) January 1, 2026
वाद अधिक चिघळत असताना, गिरधारी लाल साहू यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका मांडली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. साहू यांच्या म्हणण्यानुसार, ते एका मित्राच्या लग्नाशी संबंधित घटना सांगत होते; मात्र त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच, काँग्रेस पक्ष जाणूनबुजून त्यांच्या विधानाचे राजकारण करत असून, त्यांच्या पत्नी आणि उत्तराखंड सरकारमधील कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.