Haribhau Rathod News: धमकावल्याचा गंभीर आरोप; माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा
राठोड यांनी सांगितले की, कार्यालयात दोन प्रवेशद्वार होते, बूथ लावण्यात आले होते आणि तेथे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. अर्जदारांना टोकन देण्यात आले होते आणि इतर उमेदवारांची छाननी सुरू होती. आमच्याकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) स्वीकारण्यात आली, चेकलिस्ट पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर अर्ज संबंधित कार्यालयाकडे जमा झाला. त्यानंतर अवघ्या दहा पावलांवर दुसरे कार्यालय होते. एकूण १२ उमेदवारांचे अर्ज राहिले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
“तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घेता आणि आमच्याविरोधात अर्ज भरता?” असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. नार्वेकर सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयात ये-जा करत होते आणि याच दरम्यान त्यांनी मला धमकी दिली, मला त्यांनी ‘तुम्हाला सुरक्षा कोणी दिली?’ असा सवाल केला. मी संवैधानिक पदावर आहेत, अशा प्रकारे वागणे तुम्हाला शोभत नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले.” दरम्यान हरिभाऊ राठोड यांच्या या आरोपांमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याभोवतीचा वाद अधिकच गडद झाला असून, या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी आपल्याला धमक्या दिल्या जात होत्या, असा गंभीर आरोपही राठोड यांनी केला. नार्वेकर हे संवैधानिक पदावर असतानाही अशा पद्धतीने वागले, असा आरोप त्यांनी केला. (BJP Politics)
राठोड म्हणाले की, या संपूर्ण प्रकाराची माहिती आपण गगराणी साहेबांना दिली असून, यावर ते “आम्ही रिपोर्ट मागवत” असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांनुसार सर्व अर्ज स्वीकारले गेले पाहिजेत, मात्र १२ उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यांनी आमचे अर्ज घ्यायला हवे होते. आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. स्क्रुटनी ३१ तारखेला होणे अपेक्षित होते, मात्र ती आधीच करण्यात आली,” असा आरोप करत राठोड यांनी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा दावा केला आहे.
“कोणीही एबी फॉर्म उशिरा दिलेला नाही. आम्हाला एबी फॉर्म आठ-आठ दिवस आधीच मिळाले होते. लोक दुपारी १ ते १.३० दरम्यान आले, त्यांची प्राथमिक स्क्रुटनी झाली. अर्ज स्वीकारणं हा उमेदवारांचा हक्क आहे. तरीही अर्ज स्वीकारले गेले नाहीत. यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असून गगराणी हेही दोषी आहेत. पोलिसांनी आत जाऊ दिलं नाही, तेही जबाबदार आहेत,” असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. “आरओंनी पैसे भरून घेतले, मात्र अर्ज स्वीकारले नाहीत. सगळ्यांनी उशिरा एबी फॉर्म दिल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यामुळे संबंधित आरओंना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि गगराणी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.” असा संतापही राठोड यांनी यावेळी व्यक्त केला.
“आमचे अर्ज त्यांनी स्वीकारले आहेत. सरकारची अधिकृत रिसिप्ट आमच्याकडे आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, टोकन दिले. मात्र नंतर टोकन दिलेच नाहीत, असा दावा करण्यात आला. हे सरळसरळ खोटं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही. आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. नार्वेकर यांच्या भावाचा अर्ज जर बिनविरोध झाला, तर समजून जा की उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आलं आहे,” असा गंभीर आरोपही केला.






