'आता लाजच कोळून प्यायली’, PM मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवरून राजकारण तापणार; भाजपने काँग्रेसवर थेट…
बिहार कॉँग्रेसने जारी केला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा AI व्हिडिओ
एआय व्हिडिओवरून भाजपची कॉँग्रेसवर सडकून टीका
बिहारमध्ये वातावरण तापणार
Bihar Election 2025: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीआधी भाजप व कॉँग्रेसमध्ये एका व्हिडिओवरून वातावरण तापले आहे. बिहार कॉँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एक एआय व्हिडिओ जारी केला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा गरीब आणि सर्व मातांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे. दरम्यान ही प्रकरण नक्की काय आहे, ते जाणून घेऊयात.
नेमके काय आहे प्रकरण?
बिहार कॉँग्रेस 10 सप्टेंबर एक एआय व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा आईचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत मातोश्री मोदी यांच्याशी संवाद करताना दिसून येत आहेत. यामध्ये नोटबंदी, बिहारचे राजकारण यावर संवाद करताना दिसून येत आहे. यावर आता भाजपने आक्षेप घेतला आहे. या व्हिडिओचे शीर्षक साहब के सपनों में आईं “माँ” असे म्हणण्यात आले आहे.
साहब के सपनों में आईं "माँ"
देखिए रोचक संवाद 👇 pic.twitter.com/aA4mKGa67m
— Bihar Congress (@INCBihar) September 10, 2025
भाजपची सडकून टीका
बिहार कॉँग्रेसच्या या व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी यावर आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “यांना आपल्या आईची काळजी नाही. त्यामुळे ते दुसऱ्यांच्या आईची देखील आदर करू शकत नाहीत.” या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी गिरीराज सिंह यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचे हे षडयंत्र आहे, असल्याचा आरोप केला आहे.
बेगूसराय, बिहार: केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ने बिहार कांग्रेस द्वारा प्रधानमंत्री मोदी की दिवंगत मां पर AI जनरेटेड वीडियो पोस्ट करने पर कहा, "राहुल गांधी अब इतने नीचे गिर गए हैं। जैसे उन्हें अपनी मां का ख्याल नहीं वैसे वह दूसरे की मां का कहां से सम्मान करेंगे? इस तरह से मोदी… pic.twitter.com/xwPddwZOKh
— IANS Hindi (@IANSKhabar) September 12, 2025
राम कदमांची टीका
भाजप आमदार राम कदम यांनी देखील कॉँग्रेसवर टीका केली आहे. हा एआय व्हिडिओ केवळ गरिबांचा नव्हे तर सर्व मातांचा अपमान आहे. हे घाणेरडे राजकारण असल्याची टीका त्यांनी केली आहे.
शहजाद पूनावाला काय म्हणाले?
कॉँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान केला आहे.
#WATCH | दिल्ली: भाजपा नेता शहजाद पूनावाला ने बिहार कांग्रेस द्वारा पोस्ट किए गए AI-जनरेटेड वीडियो में कथित तौर पर पीएम मोदी और उनकी दिवंगत मां जैसे दिखने वाले दो किरदारों पर कहा, "मां का अपमान, मातृशक्ति और नारी का अपमान यही कांग्रेस की पहचान बन चुकी है। कांग्रेस ने पीएम मोदी और… pic.twitter.com/oiCByLjXNn
— ANI_HindiNews (@AHindinews) September 12, 2025
आता हा पक्ष गांधींचा नव्हे तर शिव्यांचा पक्ष झाला आहे.
कॉँग्रेसचे स्पष्टीकरण
कॉँग्रेसने व्हायरल झालेल्या या एआय व्हिडिओवरून स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “या व्हिडिओत त्यांच्या दिवंगत आईचा अनादर कुठे आहे? मला एक तरी शब्द, वाक्य असे दाखवा की त्यात अनादर दिसून येईल. प्रत्येक गोष्टीला मुद्दा करून भाजप सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न का करते?